Advertisement

बिरसा फायटर्स कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते एकामेकांशी भिडले

आदिवासी विकास मंत्र्याच्या सत्कार समारंभाला कमी व बिरसा फायटर्सच्या घंटानाद आंदोलनाला जास्त पोलीस


बिरसा फायटर्सने रस्त्यासाठी लक्ष वेधले; आदिवासी विकास मंत्र्यांचा धडगांव दौरा फ्लाॅप
 धडगांव: दिनांक 7 नोव्हेंबर रोजी बिरसा फायटर्स धडगांवचे रस्त्यावरील खड्डे बुजवा व रस्ता तात्काळ दुरूस्त करा ,या मागणीसाठी दमदार घंटानाद आंदोलन झाले.याच दिवशी नंदुरबारचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा धडगांव तालुक्यात दौरा होता,भाजपा पक्षातर्फे नागरी सत्कार समारंभ धडगांव येथे आयोजित करण्यात आला होता.परंतु मंत्री विजयकुमार गावित यांना धडगांव शहरात येण्या अगोदरच बिरसा फायटर्सचा रस्त्यासाठी दमदार असा घंटानाद आंदोलन व मोर्चा धडगांव शहरातून धणाणला.बिरसा फायटर्सच्या घंटानाद आंदोलनाच्या बंदोबस्त साठी दंगल पथक पोलिसांची मोठी गाडी भरून पोलीस व धडगांव तालुक्यातील पोलीस आले होते.त्यामुळे मोर्चात पोलीस अधिक होते व विजयकुमार गावित यांच्या सत्कार समारंभाच्या बंदोबस्त साठी कमी पोलीस दिसले.त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या,धडगांव शहरात लोक हे सगळे टक लावून बघत होते.
                     आक्रमक व जोशपूर्ण बिरसा फायटर्स धडगांव शाखा व गाव शाखा चुलवड, पिंपळबारी,गौ-या ,धनाजे शाखेतील पदाधिकारी व सदस्य यांनी कालीबेल, सिसा,चूलवड, जरली,राडीकलम, पालखा गावाच्या खड्ड्यांसमोर व शेवटी आठवडा बाजार धडगांव गाजवला.
          रस्त्यावरील खड्डे बुजवा,नाहीतर खुर्च्या खाली करा,पैसों से भिक जाओगे, ऐसे ही रोड पाओगे ,पोशा लेत मतदान कोहोते, ऐहलाच रस्ता सापडेहे,पौहा लिहून मतदान करहोत ते ,अहलाज रस्ता जुळहोत,स्थानिक पुढा-यांचा निषेध असो,धडगांव आमदारांचा निषेध असो,पालकमंत्र्यांचा निषेध असो,आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध असो,अधिका-यांचा निषेध असो,धडगांव तालुक्यातील खड्डे बुजवा,जिकडे तिकडे खड्डेच खड्डे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
        आंदोलनात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदिप पावरा तालुका महासचिव, कुवरसिंग पराडके कार्याध्यक्ष, सायसिंग पावरा गांव चूलवड अध्यक्ष व गांव टिम,अजय वळवी पिंपळबारी गाव अध्यक्ष व गांव टिम व गांवातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.
      बिरसा फायटर्सचे घंटानाद आंदोलन यशस्वी झाले, कारण उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धडगांव यांनी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांना लेखी पत्र दिले.

Post a Comment

0 Comments