Advertisement

औरंगाबाद येथे रिक्षा-मालक कृती समितीच्या वतीने ऑटो रिक्षाचालक बेमुदत संप जाहीर करण्यात आले

बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार  घालून भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चाची सुरुवात करण्यात आले


आज दिनांक एक डिसेंबर औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने ऑटो रिक्षाचा बेमुदत संप जाहीर केला आहे. अध्यक्ष सलीम खामगावकर उपाध्यक्ष मोहम्मद बशीर सचिव गजानन वानखेडे कार्याध्यक्ष शेख सरवर संघटक इम्रान पटेल जिल्हाध्यक्ष नजीर भाई संपर्क कार्यालय हर्सूल टी पॉइंट जळगाव रोड बेरीबाग कॉर्नर यांच्या उपस्थितीत.
 आज हा बंद पुकारण्यात आलेला आहे. औरंगाबाद रिक्षा चालक-मालक समितीतर्फे निवेदन देऊन वारंवार मागण्या करूनही प्रशासन रिक्षा चालकांकडे व रिक्षा चालकांच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरत असल्यामुळे व रिक्षा चालकांना मीटर कॅलिब्रेशन 28 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी कारण रिक्षाचे इन्शुरन्स पियूसी टॅक्स मीटर कॅलिब्रेशन करणे फिटनेस वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत मिळावी तर सर्व वाहन चालक मालक यांना आधार मिळेल व तीन महिन्याच्या कालावधीमध्ये शहरांमधील पूर्ण ऑटो रिक्षा हे वाहन ड्रेस कोड वर मिळतील आणि आज उपासमारीची वेळ आली आहे आज 
रोजी ट्रॅफिक कर्मचारी यांनी मोहीम चालू ठेवली आहे ती बंद करणे व एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन मधील कर्मचारी खाकी कर्मचारी हे रिक्षा चालकांना 283 च्या कलम खाली रिक्षा चालकांचे गुन्हेगारी मध्ये प्रवृत्त करत आहे व रिक्षा चालकांना गुन्हेगारीच्या कलमामुळे रिक्षा चालकांचे भविष्य धोक्यात आहे रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलम खाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नये व वाळूज एमआयडीसी ते सिडको हडकोमध्ये प्रायव्हेट सेक्टरचे कंपनी बस हे कर्मचारी ने आन करण्याचे काम करत आहे त्या पाठीमागे हे कंपनी बसचे चालक अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास येत नाही फक्त रिक्षा चालकांनाच दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले 
आहेत या उद्देशाने औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समिती एक डिसेंबर 2022 पासून रिक्षा बेमुदत संप चालू केला आहे. या संपास. 15 संघटनांनी पाठिंबा दिला1 बहुजन हिताय रिक्षा चालक-मालक संघटना2 शिव वाहतूक सेना 3 वस्ताद वाहतूक दल 4 रोशन ऑटो युनियन 5 अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी रिक्षा चालक-मालक संघटना 6 वाय एस खान रिक्षा युनियन 7 परिवर्तन ऑटो चालक-मालक संघटना 8 महाराष्ट्र रिक्षा चालक सेना 9 महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना 10 काँग्रेस रिक्षा युनियन 11 मराठवाडा ऑटो युनियन 12 पॅंथर पावर रिक्षा चालक-मालक संघटना 13 महाराष्ट्र वाहतूक सेना 14 मराठा मावळा संघटना 15 रिपाई चालक-मालक संघटना या संघटनांनी बेमुदत बंदास पाठिंबा दिला आहे. दरम्यान आज औरंगाबाद मध्ये चक्काजाम असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ झाली आहे बस मध्ये तब्बल 60 ते 70 प्रवासी मिळेल त्या ठिकाणी उभे राहून प्रवास करत आहे. औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणले असता त्यांचे असे म्हणणे आहे की प्रशासनाने याची लवकरच दखल घ्यावी आज भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments