Advertisement

गोवारी बांधवानी शैक्षणिक व आरक्षणाचा संविधानिक लढा करा-सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सांगितले


गोवारी शहिद बांधवाच्या स्मॄर्ति जिवंत ठेवण्यास शैक्षणिक लढा अव्वल करून नौकर्या बळकावा तरच विकास शक्य.


वडेगांव येथे २८ व्या शहिद दिन साजरा,एक आंतरजातीय विवाह 
सोहळा संपन्न,उपस्थितांनी दिले आशिर्वाद


प्रमोद खुशाल वघारे व किरण गुलाब पंधरे या नवदांपत्याचा अभिनव विवाह सोहळा संपन्न 

एसके जी पंधरे:-  राज्य प्रतिनिधी 

साकोली-
(२७ नोव्हेंबर) शहिदांच्या स्मॄर्तीत वडेगांव शहिद स्मारकावर दिप- प्रज्वलन केले त्याप्रसंगी वा. ह. कापगते( मा.अध्यक्ष तंमुस) अध्यक्षतेखाली सुरेशकूमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच यांचे विशेष अतिथीत शहिद दिन पार पडला व ११४ ज्योती प्रज्वलित करून स्मॄर्तीना अभिवादन केले व गोवारी बांधवासह श्रध्दाजंली दिली त्याप्रसंगी प्रभुजि राऊत, गुड्डु रहागडाले,भाऊराव लांजेवार, हेमराज गहाने, विलास राऊत,कौसल्या लांजेवार, शोभा कोचे खुशाल राने,मुकुंदा शेंदरे, अशोक राऊत,देवेंद्र राऊत, कान्हू राऊत ,निखिल नेवारे , गोंविदा नेवारे , राधेशाम सोनवाने,व समाजबाधव होते.
यावेळी पंधरे यांनी सविस्तर माहिती विशद करतानी म्हटले की दि.२३ नोव्हे १९९४ ला अधिकाऱ व हक्काची नागपूर येथे हिवाळी अधिवेशना मध्ये मागणीचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या गोवारी बांधवांच्या गर्दीवर नियंञण मिळविण्यासाठी ( गॄह विभाग प्रशासनातर्फे आकाशात अश्रॄ धुर फवारण्यात आला. व तत्कालिन शरदचंद्र पवार सरकार असतानी जो प्रकार घडला व  पोलिसांनी जी कार्यवाही केली ती निंदनिय आहे तेव्हा गोवारी बांधव ब्रँकेटतून मागे सरकत असतांनी ज्या चेंगराचेंगरात निरागस  ११४ गोवारी बांधवाचे नाहक प्राण गेले .अशा शहिदांचे वारस यांचा लढा यशस्वी झाला पण  मुंबई   उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाचा निकाल दि १४/८/ २०१८  ला आले व त्यांना गोवारी हेच गोंडगोवारी असल्याचा निर्णय प्राप्त झाला व ते एसटी प्रवर्गात आले पण ते आरक्षण जादा काळ टिकवता आले नाही नाही.परत जर त्यावेळच  युतीचे नारायन राने सरकारने माना जातीसह चंद्रकांत पाटील महशूल मंञी असता अहवाल तत्कालीन केंद्रातील अटलजी बिहारीच्या सरकार कडे पाठविला असता तर  कदाचित गोवारींचा आरक्षण गेला नसता पण ते तसे केले नाही व नंतर परत महासरकार सुप्रिम कोर्टात गेल्याने संघटणाचे दबाव वाढत गेले.
अखेर केशव सोनावणे आदिवारी गोवारि कोर्ट टिमचे विरूध्द अँड झनक मंगर नेताम (एसटी सरकार बाजू) मांडण्यात आली व अखेर गोंड व गोवारी हे वेगवेगळया जाती व त्यांची संस्कॄति व परंपरा एक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात दिसले सत्य  याचा परिणाम दि.१८/१२/२०२० ला गोवारी बांधवासाठी आरक्षणा साठी काळा दिवस ठरला. एसटी तून बाहेर जावे लागले म्हणुन समाज बांधवानी आरक्षणाच्या मागे न लागता शिका संघटीत व्हा व संघर्ष करा व उच्च पदावर जाऊन नौकर्या बळकावा असा सल्ला, मार्गदर्शन पर पध्दतशीर कायदेशीर लढा मांडून परत उलगगुलान करा असे प्रतिपादन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मचंकावर शहिदांना शब्दशा श्रध्दाजंली वाहत भाषणातून जनजागृती केली.तत्पुर्वी मंचका वर चि.प्रमोद वघारे वडेगांव संग चि सौ कांचिनी  किरन गुलाब  पंधरे भिवसनटोला नवदापंत्याचा आंतरजातीय शुभविवाह संपन्न करून अभिनव उपक्रम राबवित एक समाजा समोर आदर्श निर्माण केला. प्रास्ताविक भोजलाल शेंदरे तर संचालन/ समारोप धनपाल राऊत यांनी केले.

Post a Comment

0 Comments