Advertisement

बिरसा मुंडा जयंती उत्सव दापोलीत उत्साहात साजरा

*सांस्कृतिक कार्यक्रम,हळदीकूंकू व आदिवासी विद्यार्थी गुणगौरव*

*भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत: चंदू कोकतरे*

*आदिवासी समाजाच्या विकासासाठी  आदिवासी नेतृत्वच स्वीकारा: सुशिलकुमार पावरा*

दापोली : क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव 15 नोव्हेंबर 2022 रोजी दापोलीतील कांगवई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन शांताराम जाधव माजी अध्यक्ष  जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पुजा करून केले.दीपप्रज्वलन कादवण आश्रमशाळेचे मुख्याध्यापक  व  वेरळचे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक  यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनंतर हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेस काळूराम वाघमारे माजी पंचायत समिती सदस्य यांनी पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चंदू कोकतरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर किर्ती गायकवाड यांनी 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' प्रार्थना मधून आवाजात सादर केली.नंतर सामूहिक रित्या  आदिवासी प्रतिज्ञा म्हणण्यात आली.त्यानंतर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशिलकुमार पावरा इंटरनॅशनल आयडॉल राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांची निवड करण्यात आली.अनुमोदन विपीन गावित यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष, वक्ते व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती कांगवई तर्फे स्वागत करण्यात आले.सोनाली जाधव ह्या विद्यार्थ्यीनीने आपल्या बुलंद आवाजात आपले प्रास्ताविक भाषण सादर केले. नंतर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खामकर व चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतीकारकांचे योगदान खूप मोठे आहे.बिरसा मुंडांने इंग्रजांविरोधात अहोरात्र लढा दिला.इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध व जबरदस्तीने लादलेल्या धर्माविरुद्ध आवाज उठवला.आदिवासी समाजात क्रांती घडवायची असेल तर बिरसा फायटर्स सारख्या लढाऊ सामाजिक संघटनेसोबत राहिले पाहिजे व संघटित राहिले पाहिजे,तरच आदिवासींचा विकास शक्य आहे.बिरसा मुंडा यांचा इतिहास सांगत आदिवासी वक्ते चंदू कोकतरे यांनी आपल्या भाषणातून जनजागृती  केली.
                    या कार्यक्रमाला राजकीय पुढा-यांना न बोलावण्याचा आदिवासी बांधवांनी निर्णय घेतला ,हा निर्णय मला आवडला.राजकीय नेत्यांनी आजवर आदिवासींचा मतांसाठीच वापर केला,आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले.विकासाच्या प्रवाहात येऊच दिले नाही,आदिवासी नेतृत्व तयार होऊ दिले नाही,माझ्यासारख्या आदिवासी शिक्षकाला ,कार्यकर्त्यांला जाणीवपूर्वक टार्गेट करून  अडकवले,म्हणून राजकीय पक्षांपासून व  पुढा-यांपासून आदिवासी समाजाने दूरच राहिले पाहिजे.तरच आदिवासींचे अस्तित्व टिकून राहील, आदिवासी समाजाच्या विकासासाठी फक्त आदिवासी नेतृत्वच स्वीकारा,आजच्या जयंती उत्सावाप्रमाणेच आता दरवर्षीच बिरसा मुंडा जयंती उत्सव दापोलीत साजरा करूयात, भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा! अशा प्रकारे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सुशिलकुमार पावरा यांनी आदिवासी बांधवांत जागृती निर्माण केली.
             बिरसा मुंडा जयंती उत्सव निमित्ताने आदिवासी महिला मंडळाकडून हळदी कूंकूचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.हळदीकूंकू समारंभात कांगवई,भोंमडी,वेळवी कलानगर, विरसई, सुकोंडी,कुडावळे या गांवातील आदिवासी महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावत एकतेचा संदेश दिला.दुपारी 1 वाजता स्नेहभोजन झाले.दुपारी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.आदिवासी वादळ,आदिवासी राणी,आदिवासी राजा इत्यादी आदिवासी नृत्य,वाढीव दिसताय राव इत्यादी मराठी लावणी व चाललंय बोटी मनगटी कोळी कृत्य सादर करण्यात आले.नृत्य कलाकारांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह, पुष्प,वही व पेन देऊन बक्षीस रूपाने गौरव करण्यात आला.त्याचबरोबर दहावी,बारावी,पदवीधर, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धेत यश संपादन करणा-या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह, पुष्प, वही, पेन देऊन करण्यात आला.
                 या कार्यक्रमाला राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष ,शशिकांत निकम उपाध्यक्ष, चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी,प्रमोद निकम ,शांताराम जाधव माजी अध्यक्ष जिल्हा परिषद,  सुशिलकुमार पावरा इंटरनॅशनल आयडॉल राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, चंदू कोकतरे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता, आहेत.काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य, अशोक पवार उपाध्यक्ष उत्सव समिती,माल्या जाधव उपसचिव, गोपीनाथ चौधरी तलाठी,आशा जाधव महिला अध्यक्षा, निर्मला जाधव उपाध्यक्ष, रेश्मा वाघमारे सचिव, भाग्यश्री पवार उपसचिव, आदिवासी वाडीप्रमुख व दापोली,मंडणगड, चिपळूण,खेड तालुक्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments