Advertisement

थोर स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी मासिहा कर्मवीर आण्णासाहेब व्यंकटराव रणधीर ह्यांना विनम्र अभिवादन.!

    थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय आण्णासाहेब कर्मवीर व्यंकटराव रणधीर हे खान्देशात हे नाव आदिवासींचा मसिहा म्हणून घेतले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अविरत आदिवासी व गरजू लोकांची सेवा करण्याला आपले आद्यकर्तव्य मानले होते. त्याचबरोबर आदिवासी समाजात व शिरपूर तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली व कधीही शक्य नसलेले आदिवासींना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे आव्हान त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून मूळ प्रवाहात आणले. आज ते जर राहिले नसते तुमच्या आमच्यासारखे गरीब शेतकरी, शेतमजूरी करणाऱ्यांची मुल डॉक्टर्स, इंजिनीअर तसेच अनेक उच्चशिक्षित झाली नसती व बहुतेकांना नोकरीची आशा सोडावी लागली असती.
    संपूर्ण आयुष्य आण्णाबाबांनी शिक्षणाबरोबर तालुक्यातील लोकांचे आरोग्य कसे अविरत मजबुत राहील ह्याकडे सुद्धा तितकेच कटाक्षाने लक्ष ठेऊन होते व आदिवासी सामाजाचे आरोग्य त्यांच्यासाठी खूपच महत्वाचे होते त्यासाठी ते अनेक आजारी पिढीत लोकांना जीवनदान दिले होते अनेक रुग्णांना सेवा देत असे. एके काळी त्यावेळी प्रसूती दरम्यान एका आदिवासी महिलेचा आरोग्यसेवेअभावी मृत्यू झाला ह्या मृत महिलेमुळे आण्णाबाबा खूपच हताश झाले होते म्हणे हे कायमचेच कसे थांबवता येईल त्यासाठी त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली व शेवटी त्यांनी वैद्यकीय सेवा देणारे महाविद्यालय म्हणून त्यांनी १९७२ ह्या वर्षी खान्देशातील पाहिले शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केले त्यावेळी त्यावेळी पुण्यातील अनेक प्रस्थापित अधिकाऱ्यांनी आडकाठी केली पण कर्मवीर अण्णाबाबांनी दुर्दम्य प्रबळ इच्छाशक्ती व राजकीय पाठबळ वापरून उद्दिष्ट साध्य केले व आदिवासी समाजाला आरोग्यसेवा देण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
     आजपर्यंत ह्या महाविद्यालयात अनेक विशेष प्रावीण्य प्राप्त सामाजिक जाण व होतकरू असलेले वैद्यकीय सेवा देणारी माणसं जोडली. महाराष्ट्रातील आयुर्वेदात विशेष प्रावीण्य संपादन केलेले अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स आजपर्यंत ह्या महाविद्यालयात आदिवासी व गरीब लोकांसाठी आपली सेवा अविरतपणे बजावत आहेत.


अभिवादक_
*- डॉ.हिरा पावरा*
📞9975085483
उपाध्यक्ष - जय आदिवासी युवा शक्ती (JAYS) महाराष्ट्र.
अध्यक्ष - महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) शिरपूर.

Post a Comment

0 Comments