Advertisement

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचा उपोषणाचा लढा सुरूच

*न्याय मिळेपर्यंत उपोषणाचे सत्र सुरूच ठेवणार: सुशिलकुमार पावरा*

 दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले उपोषण सहाव्या दिवशीही दापोली येथे सुरूच ठेवले आहे. उपोषणाचे निवेदन पावरा यांनी गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे. दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण छेडले आहे.
          विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार खेड हे माझ्याविरोधात रचलेल्या षडयंत्र प्रकरणात व अनेक गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत, तसा चौकशी अहवाल त्रिसमीतीय सदस्य चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिला आहे. नंदलाल कचरू शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदासाठीची आग्रा विद्यापीठाची डिग्री अवैध आहे,ग्राह्य धरता येणार नाही,असा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला आहे.एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक रत्नागिरी यांच्यावर 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. 
                 माझ्या प्रकरणात माजी मंत्री रामदास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम अशा राजकीय मंत्री व पदाधिकारी यांचा हात असल्यामुळे मला न्याय मिळण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहेत. दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अधिका-यांना मंत्री, राजकीय पदाधिकारी वाचवत आहेत,षडयंत्र प्रकरणात माजी मंत्री रामदास कदम व त्यांचे भाऊ अण्णा -अरूण कदम यांचे नाव पोलिसांकडून समोर येत आहेत. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझे उपोषण मी सुरूच ठेवणार आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण स्थळी दिली आहे.
                   यावेळी विजय बाईत मूर्दाबाद,नंदलाल शिंदे मूर्दाबाद,एकनाथ आंबोकर मूर्दाबाद अशा घोषणा देत सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.सुशिलकुमार पावरा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत न्यायाची प्रतिक्षा करीत आहेत.

Post a Comment

0 Comments