Advertisement

मंगलमुर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ॲड.मा.श्री.आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले


प्रतिनिधी:-शंकरसिंग ठाकूर रांजणगाव
मो नं +91 86050 02886
*रांजणगाव*:-आज रोजी दिनांक 22 नोव्हेंबर 2022 जिल्हा परिषद मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला रांजणगाव गणपती भांबर्डे रोड तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2022-23 निमित्ताने स्पर्धा कार्यक्रम व उद्धाटन सकाळी 10 वाजता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरुर चे  माननीय श्री अनिल बाबर साहेब,व गटविकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती शिरुर चे माननीय श्री अजित देसाई साहेब यांच्या हस्ते करण्यात आले 
तसेच बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी 5 वाजता शिरुर विधानसभा आमदार मा श्री ॲडविकेट अशोक पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी सर्व जिल्हा परिषद मराठी शाळांनी सहभाग नोंदविला.व विविध कला क्रीडा मैदानावर खेळ लेझीम,खो-खो, कबड्डी,मल्लखांब,असे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन घेण्यात आले.
आसपासच्या शाळेतील साडे सहाशे विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभागी नोंदविला. जसे वाघाळे, बुरुंजवाडी,करंजावणे, सणसवाडी,कारेगाव,जांबुत,आलेगाव पागा,पिंपळखुंटे,रांजणगाव,अशा अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
यावेळी गावाचे सरपंच सर्जेराव जी खेडेकर साहेब तसेच शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार व सर्व शाळेचे शिक्षक वृंद शिक्षिका पत्रकार बंधू स्वयंसेवक तसेच गावकरी यांचे मोलाचे योगदान दिले

Post a Comment

0 Comments