Advertisement

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून तात्काळ हटवा: बिरसा फायटर्सची मागणी

*राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निवेदन* 

 *भगतसिंग कोश्यारी हे राजकारणी राज्यपाल : सुशिलकुमार पावरा*
 दापोली: थोर महापुरूषांबद्धल अपमानजनक व वादग्रस्त वक्तव्य करणा-या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून तात्काळ पदमुक्त करून हटवा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                  निवेदनात म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज हे जुने पुराणे आदर्श" असे अपमानकारक विधान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्र पेठून उठला आहे. राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख केलेला आहे.समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?असे वादग्रस्त विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते.
                      यापूर्वीसुद्धा महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेबाबतही त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते." कल्पना करा की सावित्रीबाईचं लग्न 10 वर्षी झालं,तेव्हा त्यांच्या पतिच वय 13 वर्ष होतं.कल्पना करा की लडके लडकीया,मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील?लग्न झाल्यावर काय विचार करत असतील? असे वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केल होतं.
               "मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले,तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही", असेही वादग्रस्त वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या होत्या.
                     राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार अशी वादग्रस्त विधाने जाणून बुजून करत आहेत.थोर महापुरूषांबद्धल अपमानजनक वक्तव्य करणा-या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या विधानबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.
                      राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजकारणी राज्यपाल आहेत. राज्यपाल सारख्या संविधानिक पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांना थोर महापुरूषांबद्धल अशी अपमानकारक विधाने करणे शोभत नाहीत.अनेक राज्यपाल झाले परंतु भगतसिंग कोश्यारींसारखा राजकारणी राज्यपाल आम्ही अजून बघितला नाही. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातील जनतेत तेड निर्माण करून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे सातत्याने काम करत आहेत. आमच्या थोर महापुरूषांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाहीत. म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून तात्काळ पदमुक्त करून हटविण्यात यावे,हीच नम्र विनंती.अन्यथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने राष्ट्रपती यांना दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments