Advertisement

पोलिसांच्या उत्तराने राज्यभर खळबळ, बिरसा फायटर्स आक्रमक

बोगस आदिवासींविरोधात कोणाचीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांचे समजपत्र 

बोगस आदिवासींविरोधात बिरसा फायटर्सची महाराष्ट्रभर कडक मोहीम

बिरसा फायटर्स पदाधिका-याचे राज्यभर पोलीस ठाण्यात लेखी जबाब 

दापोली: अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांवर जात पडताळणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 12/9/2022 रोजी निवेदनाद्वारे दिला होता.या मागणीचे निवेदन राज्यभरातून विविध जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांकडून सरकारला देण्यात आले होते.
              त्या निवेदनाची दखल घेऊन राज्यभर बोगस आदिवासींची शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.रत्नागिरी,ठाणे,सांगली,दापोली,मिरज,पलूस,अंबरनाथ, नंदुरबार इत्यादी पोलीस ठाण्यातून बिरसा फायटर्स पदाधिका-यांना याबाबत समजपत्र पाठविण्यात आले आहेत. या समजपत्रात आपण दिलेल्या अर्जानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे नोकरीला लागलेबाबत अद्यापपर्यंत कोणताही प्रकार घडलेला नाही तसेच अशा प्रकार घडलेला निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई करणेबाबत इकडील तपासणी अंमलदार यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तरी आपला तक्रारी अर्ज फाईल करण्यात आला आहे.यांची या समजपत्राद्वारे आपणास समज दिली.असे समजपत्र व्ही एस सावळगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंडल पोलीस ठाणे जिल्हा सांगली यांनी सुशिलकुमार पावरा यांना दिले आहे.
              दापोली,रत्नागिरी,कुंडल,मिरज,सांगली,पलूस, ठाणे,अंबरनाथ, नंदुरबार इत्यादी विविध भागांतील पोलीस ठाण्यातून ही समजपत्रे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहेत. त्यावर अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांवर जात पडताळणी कायद्यानुसार व मा.सर्वोच्च न्यायालय दिनांक 6 जुलै 2017 व दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या आदेशानुसार कारवाई करावी.या मागणीसाठी आम्ही वारंवार निवेदन देत आहोत व उपोषण, आंदोलन करीत आहोत व मोर्चा काढत आहोत, असा लेखी जबाब सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोली पोलीस ठाण्यात नोंदवला आहे.
              असा कोणताही प्रकार घडलेला नाही,अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आजपर्यंत प्राप्त नाही,अशा पोलिसांच्या लेखी उत्तरामुळे राज्यभर आदिवासींत खळबळ उडाली आहे.
                      बनावट व खोट्या जात प्रमाणपत्राआधारे नोकरी बळकावणा-या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने तात्पुरते अधिसंख्य पदे निर्माण करून अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळले व 12500 अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त करण्यात आल्या.जात प्रमाणपत्र नसलेल्या अशा कर्मचाऱ्यांना केवळ 11 महिन्यांच्या करारावर सेवेत वर्ग करण्यात आले तसेच नोकरीच्या सरकारी अटी व नियमानुसार जात प्रमाणपत्र नाही अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन दिले जात नाही.
                         सन 1980 साली अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नोकरीला लागलेल्या दापोलीतील शिक्षकांना 40 वर्षांहून अधिक नोकरी करून सेवानिवृत्त झाले तरी आदिवासी असल्याचा जातीचा दाखला शिक्षण विभागाला अद्यापही सादर करता आला नाही.म्हणून शिक्षण विभागाने त्यांची पेंशन रोखली आहे.या शिक्षकांनी आदिवासी असल्याचे भासवून व खोट्या जात प्रमाणपत्राआधारे नोकरी बळकावली. अशा शिक्षक उमेदवारांचे जात पडताळणी समीतीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे.म्हणजेच सदर शिक्षक उमेदवार हे आदिवासी नसल्याचे जात पडताळणी समितीला ,कोर्टाला व प्रशासनाला सुद्धा माहित पडले आहे.कुलकर्णी,राणे,घावट, पौनीकर, इंगळे,फुकट,मेनकार, रोडे ,पारशे, भांडे या आडनावांची माणसे आदिवासीत येत नाहीत. 
                            ज्या कर्मचाऱ्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाही व ज्यांचे खोटे व बनावट जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने व उच्च व सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविले आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी ऑफ्रोह ही संघटना तयार केली.या ऑफ्रोह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकार, जात पडताळणी समिती,उच्च व सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रपतींनी लबाडीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहेत, असे आरोप करण्यात येत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहेत. बनावट व खोट्या कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी व घेतलेले सर्व आर्थिक लाभ वसूल करण्यात यावेत,हीच नम्र विनंती.अन्यथा राज्यभर बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,याची नोंद घेण्यात यावी.असा आंदोलनाचा इशाराच बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments