Advertisement

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

*मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन* 

दापोली: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वादग्रस्त ग्रामसेवक रवींद्र वळवी ग्रामपंचायत दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करा,अन्यथा जिल्हा परिषद समोर तीव्र निषेध आंदोलन व उपोषण करणार असल्याची मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे केली आहे.संदर्भ:1) आरोपीचे नाव रवींद्र वळवी रा.मुंदलवड तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांच्यावर पोलीस ठाणे दापोली येथे दिनांक 17/11/2022 रोजी दाखल झालेला फौजदारी गुन्हा 2)आरोपी रवींद्र वळवी ग्रामसेवक यांनी माजी मंत्री के.सी.पाडवी यांच्याबद्दल अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी टिप्पणी केल्याबद्दल दाखल झालेला गुन्हा 

              निवेदनात म्हटले आहे की,मी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.मंत्री विजयकुमार गावित यांच्या 6 हजार कोटी भ्रष्टाचार प्रकरणाबद्दल मंत्रालयात व पोलीस ठाण्यात माझी तक्रार दाखल आहे.भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आलेल्या बातमीवरून व विजयकुमार गावित यांच्या 6000 कोटी भ्रष्टाचार घोटाळा प्रकरणावरून दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस ठाणे दापोलीत आरोपीचे नाव रवींद्र वळवी ग्रामसेवक मुंदलवड तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता 1860 नूसार कलम 504,506 अन्वये तक्रारदारास धमकी देणे,अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे,बदनामी करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी बिरसा मुंडा जयंतीनिमित्तीची "आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासींनी आदिवासी नेतृत्वच स्वीकारावे" या शीर्षकाची बातमी indigenous people, आदिवासी समाचार, आदिवासी राजकारण अशा वाॅटसप ग्रुपवर टाकले.तेव्हा आरोपी रवींद्र वळवी मुंदलवड यांनी हे सर्व नंदुरबार चे ग्रुप आहोत,असे भासवून नंदुरबार ग्रुपवर बातमी का टाकली ? असा विनाकारण वाद घातला.ग्रुपवर राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील सदस्य असून हा ग्रुप फक्त नंदुरबारचा नाही,संपूर्ण महाराष्ट्राचा आहे,असे सुशिलकुमार पावरा यांनी आरोपीस समजावण्याचा प्रयत्न केला,परंतु आरोपी रविंद्र वळवी यांनी कुणाचेही न एकता अश्लील व अर्वाच्च भाषेत सुशिलकुमार पावरा यांच्यावर टिप्पणी केली.त्यानंतर आरोपीस indigenous people, आदिवासी राजकारण अशा महाराष्ट्रातील सामाजिक ग्रुप वर बाहेर काढण्यात आले.त्यानंतर आरोपी रवींद्र वळवी यांनी सुशिलकुमार पावरा यांना तू मादरचोद, तुला एकच सांगतो ,तु चूतमारीचा, भोसडीचा,मंत्री विजयकुमार गावीत यांच्या 6000 कोटी भ्रष्टाचार प्रकरणात मी तुला तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला होता,तरी तू तक्रार मागे घेतली नाही,तोडी पाणीचा हेतू साध्य झाला नाही,म्हणून वैफल्य ग्रस्त झाला आहे.तू मला एकदा भेट मी तुला दाखवतो,अशी आईवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून मोबाईल क्रमांक. 9668545316 वरून धमकी दिली.तशी तक्रार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध नोंद करण्यात आली आहे.गुन्ह्याचा तपास मपोहेकाॅ/970 सुकाळे करीत आहेत, दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी आरोपीस फोनवर सक्त ताकीद दिली असून दापोलीत सकाळी 10 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
               आरोपीवर गुन्हा दाखल झाला तरी सुशिल पावरा नामक व्यक्ती विकृत व मानसिक दृष्ट्या पागल झालेली व्यक्ती आहे.अशी आदिवासी समाचार ग्रुपवर सुशिलकुमार पावरा यांची आरोपी रवींद्र वळवी हा बदनामी करत आहे.यापूर्वी सुद्धा आरोपी रवींद्र वळवी मुंदलवड यांनी माजी मंत्री के.सी.पाडवी यांच्याबद्दल अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट वाॅटसप ग्रुपवर टाकली होती,म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात रवींद्र वळवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वादग्रस्त रवींद्र वळवीच्या निषेध बद्दल व रवींद्र वळवी विरोधात काँग्रेस पार्टी अक्कलकुवा धडगांव तर्फे आंदोलन छेडण्यात आले होते.आरोपी रवींद्र वळवी हा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी व कर्मचारी संघटनेचा स्वयंघोषित राज्याध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा काम करतो.ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवा व शर्तीनुसार राजकीय पक्षाचे काम करता येत नाही.
            माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी 70 कोटी रूपयांचा खावटी योजना वाटपात भ्रष्टाचार केला आहे असा आरोप आरोपी रवींद्र वळवी यांनी केला आहे.मात्र विजयकुमार गावित यांच्या 6000 कोटी भ्रष्टाचार घोटाळा प्रकरणात जो काम करतो तो भ्रष्टाचार करतो,अशी भ्रष्टाचाराचे समर्थन करणा-या पोस्ट अनेक वाॅटसप ग्रुपवर टाकल्या.म्हणजेच रवींद्र वळवी हा माजी मंत्री के.सी.पाडवी यांचा विरोध करतो व तत्कालीन मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचाराचा बचाव करतो,म्हणून लोकांनी आरोपीवर शंका निर्माण केली आहे.
                   विजयकुमार गावित भ्रष्टाचार प्रकरणात यापूर्वी मंत्रालयात व आरोपी व्यक्ती दाज्या पावरा,पत्ता मु.रेवानगर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार, भाजपा सदस्य तथा पंचायत समिती सदस्य तळोदा मो.9923091422 व केदार पाडवी ,पत्ता-जिल्हा नंदुरबार मो.9922552158 या दोघांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी व पोलीस ठाणे दापोलीत तक्रार दाखल करण्यात आली होती.आता पुन्हा विजयकुमार गावित यांच्या 6000 कोटी भ्रष्टाचार प्रकरणाच्या अनुषंगाने तिस-यांदा गुन्हा आरोपी रवींद्र वळवी मुंदलवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रवींद्र वळवीचा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र विरोध व निषेध होत आहे तसेच आरोपी विरोधात आदिवासी वाॅटसप ग्रुपवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
         आरोपी रवींद्र वळवी यांचेकडून समाजसेवकांस ,प्रतिष्ठित व्यक्तींस व मंत्रीस अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे,बदनामी करणे व धमकी देणे,राजकीय पक्षाचा प्रचार व प्रसार करणे या कृत्यामुळे जिल्हा परिषद नंदूरबारची बदनामी होत आहे.आरोपी रवींद्र वळवी यांच्या अशा अशोभनीय कृत्यामुळे जिल्हा परिषद नंदूरबारची प्रतिमा मलीन होत आहे.आरोपी रवींद्र वळवी यांचे दुष्कृत्य हे ग्रामसेवक पदासाठी अशोभनीय आहे.आरोपीकडून वारंवार होणारे हे आईवरून अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे अमानवीय कृत्य माणूसकीला काळिमा फासणारे व कलंकित करणारे आहे.म्हणून वरील तक्रारींच्या व पुराव्यांआधारे आरोपी रवींद्र वळवी ग्रामसेवक यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.होणा-या परिणामास सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासन राहील.तरी आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे केली आहे.आरोपीवर प्रशासकीय कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments