Advertisement

मोलगी येथे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मध्ये संविधान दिनानिमित्ताने साजरा करण्यात आला


मोलगी:-ता.अक्कलकुवा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मोलगी व डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयूक्त विद्यमाने विद्यालयात संविधान सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी संविधान दिनानिमित्त डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन मोलगी ठाणे पोलीस निरिक्षक धनराज निळे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे बार्टीचे ब्रिजलाल पाडवी भारतीय संविधानाचे महत्व सांगितले. संविधान सप्ताह निमित्ताने आश्रम शाळेत संविधान रँली काढण्यात आली तसेच संविधान उद्देशिकेचे घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास माध्यमिक मुख्याध्यापक नटवर तडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वसतीगृह अधीक्षक बालाजी रसाळ भारतीय संविधान विषयी मार्गदर्शन केले.
 प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. बार्टीचे ब्रिजलाल पाडवी विजय चौधरी,संजय बोरसे,राजश्री चौधरी, ज्योती तडवी,शिवदास वसावे,निशा वळवी,दिपाली पाटील,लोटन पावरा,अनिल गावित,भरत नवेज,प्रभात देसले.यशवंत वळवी आदी उपस्थित सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले.आभार ज्योती तडवी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments