Advertisement

इजिमा 45 ते पाडामुंड रस्ता ठेकेदार व अभियंता यांनी हडप केला,गावकरी आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन 
 धडगांव:मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१६/१७ अंतर्गत इजिमा.45 ते पाडामुंड पाडा रस्ता (MRL-22 )ता.धडगांव जि.नंदुरबार रस्ता चौकशी करावी,अशी मागणी ग्रामस्त पाडामुंड ता. धडगांव.जि. नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
               निवेदनात म्हटले आहे की, मौजे पाडामुंड इजिमा ४५ ते पाडामुंडपाडा रस्ता (MRL-22) ता.२५/०५/२०१७रोजी कार्यरंभ आदेश प्राप्त झालेला आहे.सदर काम हे १६५.०९ लक्ष अंदाजित रक्कम .व ८.२३ लक्ष ५वर्ष दुरुस्ती रक्कम मंजुर होती.तरी सदर कामाचा कार्यरंभ आदेश प्रमाणे १२ महिने २४/०५ /२०१८ पर्यंत कामपुर्ण करणे आवश्यक होते.परंतु अद्यापपर्यंत काम पूर्णं झालेले नाही.किंवा सुरु झालेले नाही.तरी सबंधित विभाग कार्यकारी अभियंता यांनी श्री.आर.के.सांवन यांच्या संगमताने रस्ता हडप करण्याचा पर्यंत दिसून येत आहे.तसेच जागेवर कामपण झालेले नसताना.सबंधित ठेकेदारास कार्यकारी अभियंता यांच्या
विभागमार्फत संपुर्ण रक्कम आदा केल्याची दिसून येत आहे.
            रस्ता सन २०१६ -१७ मध्ये मंजूर झालेला आहे.व आता २०२२ संपत आले.तरी अद्यापर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही.तरी रस्ता अपूर्ण असल्याने गावातील बालकांचे,वयोवृद्ध,गरोदर महिलांचे हाल होत आहे.त्यामुळे जिवित हानी झाल्यास त्यास सबंधित ठेकेदार आर.के.सांवन व कार्यकारी अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करण्यात येईल.तसेच सदर ठेकेदार आर.के.सांवन संस्था Black List मध्ये नांव टाकण्यात यावे.तसेच सदर रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण न झाल्यास आम्ही पाडामुंड ग्रामस्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार आहे.
   खालील सही /अंगठे करणारे गावातील ग्रामस्त.१) अनिता सुनिल तडवी ( सरपंच ) २) सुनिल बिरम्या तडवी (माझी सरपंच ) ३) हेमंत मालदया तडवी (ग्रा.सदस्य )४) मथुराबाई चिंतामण तडवी (ग्रा.सदस्य ) ५) आमसीबाई बोंडा तडवी (ग्रा.सदस्य ) ६) अशोक विजय तडवी (ग्रा.सदस्य ) ७)गोविंद वन्या तडवी८)चिंतामण सिपा तडवी९)निमजी बुल्या तडवी१०)किसन बिरम्या तडवी११)रामसिंग इंदया तडवी१२)धिरसिग बिंद्या तडवी१३)पारता तिज्या तडवी१४)वन्या पारशी तडवी१५)फत्तेसिंग माकत्या तडवी
यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments