Advertisement

मंत्री ,आमदारांचा खड्ड्यांचा रस्ता ! बिरसा फायटर्सचे घंटानाद आंदोलन

*खड्डे बुजवा किंवा रस्ताच नवीन बनवा : बिरसा फायटर्सची मागणी*

*खड्ड्यातून जाताना मंत्री ,आमदार,पुढा-यांना लाज का नाही वाटत!*

धडगांव: धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करणे या मागणीसाठी खड्डयांसमोरच घंटा नाद आंदोलन बिरसा फायटर्स धडगांव शाखेतर्फे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.या आंदोलनात गांव शाखा चूलवड, कालीबेल,सिसा,जरली, राडीकलम, पालखा इत्यादी गावातील कार्यकर्ते शामिल होणार आहेत. आंदोलनाचे निवेदन तहसीलदार धडगांव यांना सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, राजेंद्र पावरा तालुकाध्यक्ष धडगांव, प्रदिप पावरा महासचिव धडगांव, सायसिंग पावरा गांव अध्यक्ष चूलवड यांनी दिले आहे.
                निवेदनात म्हटले आहे की,धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा रस्त्याची सध्या वाईट अवस्था झाली आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे हा रस्ता विद्यमान आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या मतदारसंघातील रस्ता असून मंत्री के.सी.पाडवी यांच्या असली गावाकडे जाणारा हा रस्ता आहे.धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे.धडगाव हून चुलवड कालीबेल दाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जरली मार्गाचा वापर करतात,परंतू जरली येथील पूलावरील लोखंड वर उखडून आले आहे,पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल,अशी स्थिती निर्माण झाली आहे,म्हणून लोक जरली मार्गाचा वापर न करता धडगांव हून राडीकलम मार्गे चूलवड कालीबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत. 
                      रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.
मंत्री महोदय या खड्ड्यातून आपल्या गावाकडे जातात की काय ? की आपल्या गावातच येत नाहीत की काय? असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा.रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास व रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करत येथील लोकप्रतिनिधी आदिवासी विकास मंत्री व प्रशासनासुद्धा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत. तरी सदर रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा,हीच नम्र विनंती.
                 या मागणीचे निवेदन मा.परिवहन मंत्री, मंत्रालय मुंबई, मा.आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार, मा. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, मा. उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिले होते. तरी रस्त्यावरील खड्डे बुजवून अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दिनांक 31/10/2022 रोजी सकाळी घंटा नाद आंदोलन करणार आहोत.घंटा नाद आंदोलन पुढील प्रमाणे,गांव कालीबेल बसस्थानक जवळील खड्डे समोर सकाळी 10. ते 10.30 वाजता,गाव सिसा बसस्थानक जवळील खड्डे समोर सकाळी 10.30 ते 11.00 वाजता,गाव चुलवड बसस्थानक जवळील खड्डे समोर दुपारी 11. 30 ते 12.00,गाव बाहगाया जारली फाटा समोर दुपारी 12.00 ते 12.30 ,गाव राडीकलम बसस्थानक जवळील खड्डे समोर दुपारी 12.30 ते 1.00,गाव पालखा बसस्थानक जवळील खड्डे समोर दुपारी 1.00ते 1.30,तहसीलदार कार्यालय समोर दुपारी 2.00 वाजता निवेदन देणे याप्रमाणे घंटानाद आंदोलन होणार आहे.
      हा रस्ता 40 वर्षापासून दुरुस्तच करण्यात आला नाही,त्यामुळे प्रवाशी व ग्रामस्थांचा धडगांव तालुक्यातील पुढारी व नंदुरबार जिल्ह्य़ातील मंत्री,आमदार यांच्याबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे.या मंत्री आमदार पुढा-यांना या खड्ड्यातून जाताना लाज का नाही वाटत!असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

Post a Comment

0 Comments