Advertisement

फुले शाहू आंबेडकर मदर टेरेसा चे प्रेरणा स्तोत्राचे वृद्धांचे चे विभूती,

समाजसेवक, पत्रकार -श्रीकृष्ण देशभ्रतार 

लेखक : संजीव भांबोरे , मधुकर कोहाडे

श्रीकृष्ण देशभ्रतार यांचा जन्म दि.०९/१०/१९७३ ला निर्धन गरीब कुटुंबात झाला. वडीलाची अत्यंत खडतर परिस्थिती हातावर आनणे आणि पानावर खाणे ” या म्हणी प्रमाणे होती. त्यात आई सोबत सासू सासऱ्याचा कौटुंबीक भांडण (वाद) होऊन सहा महिण्याचा असतांनी मला शारीरिक अपंगत्व (दिव्यांग) ८२% कायमसवरुपी प्राप्त झाले. त्यामुळे शारीरक,सामाजिक,शैक्षणिक,कौटुंबीक यातना भोगाव्या लागत असून अनुभवाचे चटके असह्य होत असे
 पण आई वडिलांची प्रेरणा,भारतीय संस्कृती,समाजसेवेच्या चळवळीसाठी स्वस्थ बसू देईना मी १२ वर्षाचा असतांना म्हणजे सन १९८५ ला माझे गुरुवर्य रा.पु.तिवारी यांनी पाचव्या वर्गात वक्तृत्व व कविता गायन साठी प्रवुत्त केले.व भाग घेतला पहिल्याच प्रयत्नात वक्तृत्व व कविता गायन स्पर्धेत शाळेतून प्रथमच पुरुस्कृत ठरले व श्रीकृष्ण यांच्या विजयाचा सम्मान शाळेभर पसरला.वयाच्या १८ वर्षाचा असतांनी त्यांनी सन १९९१ ला सामाजिक क्रांतिकारी संघटना निर्माण केली.
 व दुसरी ते ७व्या वर्गापर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्याचा ध्यास धरला.अनेक मागास्वर्गीय व इतर मागास्वर्गीय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न केला. परतू निर्धन असल्यामुळे प्रसिद्धी पासून मुकावे लागले .वर्ग १० व्या वर्गात शिकत असतांना खडतर परिस्थितीत आईला अलसर ची शस्त्रक्रिया झाल्यामुळे व श्रीकृष्ण यांना दोनीही पायाला अपंगत्व आल्यामुळे काही दिवस शिक्षण खुंटावे लागले व त्यातच स्वयंरोजगार होण्यासाठी मा.पंतप्रधान अटल बिहारी अपंगांना बाजपायी ३% आरक्षण योजना सुरु केल्यामुळे बँकेना कर्जासाठी अर्ज केले. 
असता बँक मैनेजरनी फेटाळून लावले. व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बँकेसमोर आंदोलन त्यांनी उभे केले येथून समाजसेवेची चिंगारी निर्माण झाली व “दि.सेल्फ स्टंड रिव्होल्युशन सोशल एज्युकेशन (फ्रंट) सोसायटी” द्वारे लीलादेवी मातोश्री निराश्रित वृद्धाश्रम च्या माध्यमाने निराश्रित,वृध्द अपंगांनी आश्रय देऊन त्यांना पालन पोषण करून त्यांचा स्वाभिमान मुक्त करण्याचा कार्य करत आहे. 
त्याच प्रमाणे शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महात्मा फुले शिक्षण हमी अंतर्गत जीवन पूर्व प्राथमिक शाळेची सोय करून अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. तसेच विधवा, बेबस, लाचार, स्त्रियासाठी जीवन मंजुषा निराश्रित वृद्धाश्रमाची सोय करून त्यांना आश्रय देऊन अनेक विधवा, बेबस ,स्त्रियांना स्वामित्व मिळवून दिले. 
सध्या कोरोनामुळे लाकडावुन मुळे बंद पाडल्या गेले. गरीब होतकरू विद्यार्थी मुंबई होकेशनल बोर्ड च्या अंतर्गत जीवन कला टेक्निकल इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून क्रीडा कौशल्य प्रशिक्षण अभियान चालवून अनेक विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार भीमुक्त घडविले आज ते स्वयंरोजगार आहेत.
 अपंगाच्या न्याय व हक्कासाठी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना तयार केली असून अपंगांना जागृत करून स्वयंरोजगार भिमुक्ता साठी व न्याय हक्कासाठी गाव पासून राज्याते देश पातळीवर लढा देण्याचे कार्य करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या समस्या हे शासनापर्यंत पोहोचत व शासन स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी “साप्ताहिक जनता की आवाज” वृत्तपत्र त्याद्वारे लेख,अग्रलेख, संपादकीय च्या माध्यमातून ग्रामीण स्तरापासून ते शासन स्तरावर पोहोचविण्याचे अनेक कार्य समाज सेवेच्या माध्यमातून करत आहेत. ते अपंग असून सुद्धा आपल्या परिस्थितीची मुला बाळाची तमा न बाळगता समाजसेवेचे व्रत्त घेतले असून त्यांचे कवितासंग्रह ‘प्रीतबंध,फास्फेट,मशाली,विवेक, डिस्कवरी ऑफ माय लाईफ, आत्म चरित्र, नाटक व कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रज्ञा साहित्य समिती,लोकरंग साहित्य समिती, अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक /सचिव ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा सचिव, जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फॉर्स विदर्भ अध्यक्ष आहेत. समाजसेवेचे कार्य राज्य,व देश पातळीवर उत्तम प्रकारे असल्यामुळे अनेक संघटना द्वारे सत्कार करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments