Advertisement

ग्रामीण भागांतील विकासासाठी गट-तट सोडून एकत्रित काम करा-राजेंद्र पाडवी (तुळाजा येथे बिरसा फायटर्सची २५७ वी नवीन शाखा)

तळोदा(प्रतिनिधी)ग्रामीण भागातील शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक,पेसा कायदा,विविध शासकीय योजनेचा लाभ याविषयी जनजागृती करून,समस्या सोडवून खेड्यांच्या विकासासाठी गट -तट सोडून सर्वानी ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहनाबरोबरचं बिरसा फायटर्सचे संघटनेचे उद्देश राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी उपस्थित ग्रामस्थांनी पटवून सांगितले.
आदिवासी अमूल्य संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे.आपल्या पारंपारिक रूढीनुसार सर्व कार्यक्रम झाले पाहिजे असे आवाहन जिल्हाध्यक्ष भरत पावरा यांनी केले.यावेळी तुळाजा येथे २५७ वी नवीन शाखा घोषित करण्यात आली.शाखाध्यक्ष प्रदीप पटले, उपाध्यक्ष राजेश ठाकरे,सचिव मनोहर ठाकरे,कार्याध्यक्ष इन्सान पटले,सल्लागार कृष्णा खर्डे, सहसचिव किरण पटले, संघटक गोपाल पटले,निरीक्षक करन ठाकरे,महिला प्रतिनिधी संगीता ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,तालुका कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,खर्डी बु!! चे शाखाध्यक्ष जितेंद्र वळवी,दिनेश वळवी,अनिल पाडवी,दिवाण वळवी,विष्णू पाडवी,केशव पाडवी,धनराज खर्डे, अविनाश शेवाळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments