Advertisement

माझे गाव माझे शिवार या ग्रुप तर्फे लक्ष्मी पुजनाच्या दिवशी अनाथ मुलांना भेटवस्तू देण्यात आले

प्रतिनिधी:अजंग

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी माझे गाव माझे शिवार या वॉटस्पो ग्रुप अजंग तर्फे लक्ष्मी पुजनाच्या दिवशी अनाथ मुलांना ज्यांचे आई वडील नसलेले लहान मुलांना दिवाळीनिमित्ताने माझे गाव माझे शिवार ग्रुपचे ॲडमिन सुभाष दादा यांनी ग्रुप मध्ये सर्व सदस्य यांना सुचवले की आपल्या ग्रुप तर्फे लहान मुलांना दिवाळीनिमित्ताने काही तरी वस्तू भेट देऊ या फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून मदत करुया असे सांगितले तेव्हा सदस्य यांनी सुद्धा सांगितले की अगदी महत्त्वाचे निर्णय आहे
 सुभाष दादा असे सांगितले तेव्हा गावातील लहान मुलांना दिवाळीनिमित्ताने ४ मुलांना कपडे व एका मुलीला ड्रेस आणि मुलांना चिवडा,सोनपापाडी पॅकेट,भाखरवडी, मिठाई, तसेच एका विधवा महिला ला पैठणी साडी व फराळ असे इत्यादी भेट वस्तू म्हणून माझे गाव माझे शिवार या ग्रुप तर्फे ॲडमीन व सदस्यांनी मदत करण्यात आली व ग्रुप ॲडमीन सुभाष दादा यांनी सांगितले की असे उपक्रम सर्व ग्रुपच्या माध्यमातून केलं पाहिजे कारणं की ग्रुप हा चांगला कामासाठी असतो ग्रुपच्या उपयोग म्हणजे कोणाचे समस्या सोडविण्यासाठी कोणावर अन्याय अत्याचार होत
 असेल त्यांना मदत करणे असे ग्रुपचे उदेश असते तर आम्ही ही आमच्या ग्रुप तर्फे छोटासा प्रयत्न करुन आज गावातील लहान मुलांना दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आले तसेच भेट वस्तू देताना नंदलाल पाटील, विजय माळी,पवन माळी,बाळा पाटील,राजू पाटील, हर्षल मिस्तरी, वसंत सोनार, असे अनेक ग्रामस्थांनी व सदस्य यांनी भेट दिली

Post a Comment

0 Comments