Advertisement

पथनाट्यद्वारे कर्णबधिर बालकांसाठी दापोलीत जनजागृती

*होमिओपॅथिक व रामराजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांतर्फे पथनाट्य* 

दापोली:काॅक्लिआ पुणे फाॅर हिअरींग अन्ड स्पिच पुणे संचालित स्वरनाद भाषा, वाचा प्रशिक्षण केंद्र दापोली मार्फत जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त आज दापोली शहरात पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली.शिवसेना शहर कार्यालय,बसस्थानक दापोली,सरकारी दवाखाना दापोली येथे ही पथनाट्य सादर करण्यात आली व केळस्कर नाका,पोलीस लाईन कडून बुरोंडी नाका पर्यंत रॅली काढण्यात आली.होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली व रामराजे मेडिकल कॉलेज दापोलीतील विद्यार्थ्यांनी दापोली शहरात विविध ठिकाणी 0 ते 6 वयोगटातील जन्मजात कर्णबधिर बालकांसाठी पथनाट्ये सादर केली.यावेळी कार्यकारी विश्वस्त डाॅ.अविनाश वाचासुंदर, शिक्षक लवित पवार,सौ.पूजा पवार, डाॅ.प्रतिक भांबुरे,शिवाजी गोरे पत्रकार, जालिंदर पाटील, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महेश भागवत ,डाॅ.चेतना गोरीवले,दापोलीचे आरबीएसके ,निलेश हेदूकर, दापोली केन्द्र प्रमुख डाॅ.प्रकाश घांगुर्डे,डाॅ.निता घांगुर्डे, शिक्षण विभाग प्रमुख रक्षाताई देशपांडे सह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
              कर्णबधिर मूल बोलू शकेल, फक्त आपल्या मदतीची गरज आहे.लहान वयात जन्मजात कर्णबधिर बालकांना ओळखून त्यांना केन्द्रावर आणावे.कर्णबधिर मुलांच्या पालकांना केन्द्राची माहिती व्हावी,यासाठी ही जनजागृती करण्यात आली.कर्णबधिर बालकांना बोलते करता येते.0 ते 6 वयाच्या काळात योग्य वैद्यकीय उपचार, श्रवणयंत्र, काॅक्लीअर इंमप्लांट शस्त्रक्रिया व स्पीच थेरपी यांच्या मदतीने अशी मुले बोलू शकतात.यासाठी आपण काय करू शकतो?स्वरनाद व कर्णबधिर मुलांमधील दुवा बनू शकतो.
                     मुल कर्णबधिर आहे हे कसे ओळखावे? ते नावाने हाक मारल्यावर प्रतिसाद देत नाही.भांड्यांचा आवाज, गाड्यांचा हार्न, टाळीचा आवाज, टिव्ही,लाऊडस्पीकर यासारख्या मोठ्या आवाजाने बाळ दचकत नाही.मुलाला इतरांचे बोलणे त्यांच्या चेहर्‍याकडे पाहून समजते.एक ते दीड वर्षाचे मूल बा बा,ऊ,आ असे आवाज करत नाही.अशा अडचणी असल्यास मूल कर्णबधिर असल्याची शक्यता असते. 
             मुलाच्या आईवडिलांचे नात्यातील लग्न,गरोदरपणातील आजार व काही औषधे,बाळाला जन्मानंतर लगेच झालेले काही आजार,मातेला मद्यपान धुम्रपान यासारख्या सवयी ,अपघात अशी कर्णबधित्व येण्याची कारणे असू शकतात. अशा कर्णबधिर मुलांना बोलते करण्यासाठी स्वरनाद कार्यरत आहे.अशी जनजागृती या कार्यक्रमातून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments