Advertisement

बिरसा फायटर्स धडगांवची सहविचार सभा उत्साहात संपन्न

*आदिवासींच्या विविध विषयांवर सभेत चर्चा*
  धडगांव: दिनांक 30 ऑक्टोबर रोजी बिरसा फायटर्स धडगांवची सहविचार सभा एस व्ही ठक्कर सांस्कृतिक हाॅल धडगांव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.बिरसा फायटर्स तालुका शाखा धडगांव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभा, क्रांतीसुर्य, जननायक,धरतीआबा बिरसा मुंडा व आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेच पुष्पहार अर्पण करून व सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आलेल्या सर्व पदाधिकार्यांचे क्षीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला लाभलेले बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,बिरसा फायटर्स महा.राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,ध्यानंद दादा (नाशिक विभागीय प्रवक्ता), राजेंद्र पावरा तालुकाध्यक्ष धडगांव, सुभाष पावरा तालुकाध्यक्ष तळोदा, संदिप रावताळे तालुकाध्यक्ष शहादा,सायसिंग पावरा अध्यक्ष शाखा चुलवड,अजय वळवी अध्यक्ष शाखा पिंपळबारी,अनुप वळवी अध्यक्ष शाखा असली,मोहन वळवी अध्यक्ष शाखा राणीपुर, अशोक वळवी महा.राज्य सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
                          कार्यक्रमामध्ये पुढे कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सर यांनी केले.आदिवासी विरुद्ध शासनाचे धोरणे, शासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासीचा गंभीर प्रश्न, प्रत्येक जिल्हा,तालुका पातळीवर व गावोगावी संघटनेच्या शाखा तयार करणे.तरुणांमध्ये संघटण कौशल्य निर्माण करणे व आदिवासी समाजाला एकसंघ ठेवणे असे अनेक विषयांबद्दल सुशिलकुमार पावरा सरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.त्यांच्या वक्तृत्वाची कला पाहून संपूर्ण सभा भारावून गेले.त्यानंतर पुढे कार्यक्रमात राजेंद्र पाडवी महा.राज्य महासचिव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आदिवासी संघटन, बळकटीकरण,समाजाची रुढी-परंपरा, संस्कृती, संवर्धन-जतण व काही आदिवासी हे खिश्चन, मुस्लिम आणि इतर धर्मात धर्मांतर करत आहे त्यांना रोखणे आणि आदिवासी समाजाला एकजुट करणे,अशा विषयांवर वकृत्व केले.त्या नंतर दयानंद दादा (नाशिकीय विभागीय प्रवक्ता) यांनी आदिवासींच शिक्षण, तसेच गावातील-पाडयातील पाणी,रस्ते, विद्युत, दवाखाने, कुपोषण यांसारख्या अनेक गंभीर विषयांवर भाष्य केले.मध्येच टाळ्यांच्या गजरात व आदिवासी क्रांतिकारकांच्या घोषणा देत सभेत एक वेगळीच स्फूर्ती निर्माण झाली.पुढं सभेत अनेक तालुक्यातील व गावांतील पदाधिकार्यांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले.
                    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप पावरा महासचिव (नंदुरबार जिल्हा) व सुरज पावरा महासचिव(शाखा चुलवड) यांनी केले.धडगांव येथे आयोजित केलेल्या या सहविचार सभेत नंदुरबार,शहादा, तळोदा व अनेक तालुक्यातील गावातील पदाधिकारी, सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.बिरसा फायटर्स संघटनेची बैठक उत्साहात संपन्न झाली.राजेंद्र पावरा धडगांव तालुकाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करुन कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments