Advertisement

आदिवासी भिल्ल समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणा-या आमदार जयकुमार रावल वरील अँस्ट्रासिटीचा गुन्हा रद्द करू नका,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन: बिरसा फायटर्सची मागणी

भंडारा :-आदिवासी समाजाला जातिवाचक शिवीगाळ करणारे माजी मंत्री तथा शिंदखेड्याचे विद्यमान आमदार जयकुमार रावल सह इतरांवरील एट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करू नका,अन्यथा संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांच्याकडे एका ईमेल निवेदना द्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे, राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव राजेंद्र पाडवी,सचिव दळवी, महानिरीक्षक दादाजी बागुल,हसन तडवी प्रसिद्धीप्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा,कोकण विभागीय अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत,नाशिक अध्यक्ष उमाकांत कापडणीस, नाशिक कार्याध्यक्ष विजय सहारे , धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा,कार्याध्यक्ष गणेश खर्डे,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,बागलाण तालुकाध्यक्ष आकाश पवार आदि राज्यातील बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी सुद्धा प्रशासनाला निवेदन पाठविली आहेत. 
                         संपूर्ण देशात दसऱ्याच्या दिवशी महात्मा रावण दहन करू नये, जर न्यायप्रिय राजा रावणाचे दहन करतील त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३(अ), २९५, २९८, मुंबई पोलीस ॲक्ट नुसार १३१, १३४, १३५ कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली होती.
दि. ०५/१०/२०२२ रोजी दोंडाईचा ता. शिंदखेडा येथे माजी मंत्री तथा शिंदखेड्याचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी न्यायप्रिय रावणाचे दहन करून त्यांनी आदिवासी भिल्ल समाजाला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अंकुश नाईक रा. टेकभिलाटी दोंडाईचा ता. शिंदखेडा यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे प्रथम खबर देऊन आदिवासी समाजाला जातिवाचक शिवीगाळ करणारे माजी मंत्री तथा शिंदखेड्याचे विद्यमान आमदार जयकुमार रावल सह इतरांवर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सदर गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून भाजपाचे पदाधिकारी यांनी मागणी केलेली आहे. तसेच राजकीय वापर करून फिर्यातदार अंकुश नाईक यांच्यावर दबाव टाकून फिर्याद मागे घेण्यास सांगत आहे.
महोदय, आपणांस विनंती करितो की सदर प्रकरणी प्रथम खबर देणाऱ्या अंकूश नाईक यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना काही जिवीतहानी होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण पुरवण्यात यावेत. तसेच माजी मंत्री तथा शिंदखेड्याचे विद्यमान आमदार जयकुमार रावल सह इतरांवरील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३(अ), २९५, २९८, मुंबई पोलीस ॲक्ट नुसार १३१, १३४, १३५ कलमान्वये दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात येऊ नये.हि नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments