Advertisement

मोर्चा दाबण्यासाठी कुलगुरूंनी माझ्यावर दबाव आणला: सुशिलकुमार पावरा


साहेब, मी शिक्षक पदावर नाही,राष्ट्रीय अध्यक्ष पदावर: सुशिलकुमार पावरा

*विद्यापीठातील आमच्या 9 बोगस कर्मचाऱ्यांना माफ करा: कुलगुरू डाॅ.संजय सावंत* 

दापोली:दापोलीत झालेला आदिवासींचा मोर्चा दाबण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत यांनी माझ्यावर दबाव आणला होता,असा खळबळजनक आरोप सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय  अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केला आहे.विद्यापीठातील आमच्या 9 बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना माफ करा,बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही,तेव्हा मोर्चा विद्यापीठात आणू नका,असे सुद्धा कुलगुरू म्हणाले,असल्याचा खळबळजनक आरोप सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर सुशिलकुमार पावरा यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती.आदिवासींच्या मागण्यांबाबत कुलगुरू यांनी नकारात्मक काही बाबी बोलल्या,तसेच माझ्याबद्दल वैयक्तिक माहिती विचारून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला,असे पावरा म्हणाले.
                     बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या.स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकर भरतीत  प्राधान्य द्या,मा.सर्वोच्च न्यायालयाचा 6 जुलै  2017 रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, दापोलीत आदिवासी भवन बांधण्यात यावे,हुतात्मा नाग्या कातकरी यांचा पुतळा उभारण्यात यावा,  या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स व आदिम आदिवासी कातकरी संघटनेतर्फे दापोलीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी मोर्चा  व ठिय्या आंदोलन झाले. दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी या मोर्चा व आंदोलनातील विषयांबाबत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत व सुशिलकुमार पावरा यांच्यात तब्बल 30 मिनिटे चर्चा करण्यात आली.
                या चर्चेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने  नियमानुसार कारवाई  करावी,अशी मागणी केली.तेव्हा कुलगुरू यांनी सुशिलकुमार पावरा यांना विचारले की, तुम्ही काय करता? कोणत्या शाळेत आहेत?येथे रजा टाकून आले का?त्यावर सुशिलकुमार पावरा यांनी उत्तर दिले की,मी एक शिक्षक आहे.खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदर शाळेत माझी आस्थापना आहे.सामाजिक कार्य करत असताना रामदास कदम यांनी मला अडकवले आहे.मी सध्या शिक्षक पदावर कार्यरत नाही,तर बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक  संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आहे.एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कामे करतो. त्यावर कुलगुरू यांनी ,तुम्हाला तुमच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा!अशा सदिच्छा सुशिलकुमार पावरा यांना दिल्या.
                 कुलगुरू यांनी मला सरकारी कर्मचारी समजून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला,त्यांनी माझी वैयक्तिक माहिती विचारायला नको पाहिजे होती,सामाजिक कार्यकर्त्यांवर असे दबाव आणणे हे उचित नाही,आम्ही कुठल्याच दबावाला बळी पडत नाहीत,प्रशासनाने अडवणूक केली तरी दापोलीतील आमचा आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन यशस्वी झाले, असे सुशिलकुमार पावरा म्हणाले.

Post a Comment

0 Comments