Advertisement

माझ्या प्रकरणात रामदास कदम यांना जामीन मिळणार नाही: सुशिलकुमार पावरा

*षडयंत्र रचणे हा अजामीनपात्र गुन्हा;3 वर्षे कारावास* 

*शिक्षक पावरा यांचे 352 वे उपोषण* 

दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या दापोली येथील उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी हे उपोषण छेडले आहे.
                विजय दाजी बाईत या दोषी अधिकाऱ्यांला वाचविण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम अशा राजकीय मंत्री व पदाधिकारी यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले.मला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले.माझ्याविरोधातल्या षडयंत्र प्रकरणात माजी मंत्री रामदास कदम यांचे नाव समोर आले आहे.षडयंत्रात रामदास कदम शामिल असल्याचे काही पुरावे मला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र रचणा-या रामदास कदम यांना जामीन सुद्धा मिळणार नाही.षडयंत्र रचणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.भारतीय दंड संहिता कलम 120अ व 120 ब अनुसार षडयंत्र रचणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होतो,या गुन्ह्य़ात आरोपींना जामीन मिळत नाही, आरोपींना 3 वर्षे कारावासाची शिक्षा होते.त्यामुळे मला न्यायदेवतेवर विश्वास आहे.माझ्या प्रकरणात षडयंत्र रचणा-यांना कठोर शिक्षा होईल. 
                   दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अधिका-यांना मंत्री व राजकीय पदाधिकारी पाठीशी घालतात.म्हणून त्यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझी उपोषण मी सुरूच ठेवणार आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण स्थळी दिली आहे.

Post a Comment

0 Comments