Advertisement

तलावडी,अंबापूर गावाचा पेसा क्षेत्रात समावेश करा,मागणीसाठी बिरसा फायटर्सचे 6 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन

शहादा: शहादा तालुक्यातील तलावडी ,अंबापूर व इतर आदिवासी बहूल गांवांचा पेसा क्षेत्रात समावेश करणे,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता ठिय्या आंदोलन होणार आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी शहादा यांना सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स व संदीप रावताळे तालुकाध्यक्ष शहादा यांनी बिरसा फायटर्स शहादा तर्फे निवेदन दिले आहे.
         निवेदनात म्हटले आहे का,,शहाद्या तालुक्यातील तलावडी,आंबापूर व इतर आदिवासी बहूल गांवात आदिवासींची लोकवस्ती,लोकसंख्या ही 70% ते 90% पेक्षा अधिक आहे.तरी सदर गांवांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही.त्यामुळेच या गावातील आदिवासी नागरिकांना पेसा क्षेत्रा अंतर्गत राबविल्या जाणा-या अनेक शासकीय योजनांपासून व लाभापासून वंचित राहावे लागत आहे.तलावडी व अंबापूर या गावाच्या सिमेलगत व आजूबाजूची गांवे राणीपूर ,लक्कडकोट इत्यादी गांवांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
        महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, 2014 अंतर्गत नियम 4 अन्वये गांव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेनूसार 26 जुलै ते 9 ऑगस्ट 2018 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्य़ातील अनेक गांवांचा नव्याने पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.त्याप्रमाणे शहाद्या तालुक्यातील तलावडी ,अंबापूर व इतर आदिवासी बहूल गांवांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात यावा.यासाठी यापूर्वीही शासनास निवेदन देण्यात आली आहेत. परंतु अद्यापही या गांवांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आला नाही.म्हणून शहादा तालुक्यातील तलावडी ,अंबापूर व इतर आदिवासी बहूल गांवांचा समावेश पेसा क्षेत्रात करण्यात यावा,या मागणीसाठी आम्ही बिरसा फायटर्स तालुका शाखा शहादा व शहादा तालुक्यातील गांव शाखांतर्फे मा.उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर दिनांक 06/11/2022 रोजी दुपारी 12.00 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहोत, तरी आंदोलनास परवानगी मिळावी.
          बिरसा फायटर्सच्या या ठिय्या आंदोलनात शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी शामिल व्हावे,असे आवाहन बिरसा फायटर्स शहादा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments