Advertisement

बिरसा फायटर्सच्या 300 शाखा पूर्ण

*2 लाखांहून अधिक सभासद संख्या*

रत्नागिरी: बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेच्या 300 शाखा पूर्ण झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो आदिवासी कार्यकर्त्यांनी बिरसा फायटर्स संघटनेत प्रवेश केला व नवीन शाखा तयार केल्या आहेत. या नवीन शाखांत चिपळूण, दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील तालुका शाखा व गाव शाखांचा समावेश आहे.
             रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच नवीन शाखा जाहीर करण्यात आल्या.नवीन शाखांत चिपळूण तालुकाध्यक्ष पदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.तर तालुका सचिव पदी अक्षय निकम यांची निवड करण्यात आली.सुरेश पवार, अक्षय निकम सह चिपळूण मधील हजारों आदिवासी कार्यकर्त्यांनी सुशिलकुमार पावरा यांच्या सामाजिक कामाला प्रभावित होऊन बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सुरेश पवार निकम यांची चिपळूण तालुकाध्यक्ष पदी निवड केली व सचिव पदी अक्षय निकम यांची निवड केली.तसेच उर्वरित चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
           एका वर्षात 300 पेक्षा अधिक शाखा असणारी बिरसा फायटर्स ही महाराष्ट्रातील पहिली व एकमेव आदिवासींची सामाजिक संघटना आहे.ही संघटना वैचारिक व लढाऊ आहे.बिरसा फायटर्स संघटना रोज राज्यातील आदिवासींच्या व सामाजिक नव नवीन विषय हाताळले. संघटनेची सभासद संख्या 2 लाखांहून अधिक झाल्याचा अंदाज आहे.बिरसा फायटर्सच्या लढाऊ पदाधिका-यांच्या कामांना प्रभावित होऊन नवीन नवीन कार्यकर्ते बिरसा फायटर्स संघटनेत येत आहेत व रोज नवीन शाखा तयार होत आहेत. 
         बिरसा फायटर्सच्या 300 शाखा पूर्ण झाल्याबद्दल बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी राज्यातील राज्य शाखा,विभाग शाखा,जिल्हा शाखा, तालुका शाखा ,गाव शाखा सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक केले आहे.नवीन कार्यकारिणी तील पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments