--लाखांदूर तालुक्यातील सरपंच संघटनेचा एकमताने ठराव.
--लाखांदूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींचा निर्धार.
-: निवेदन :-
*उपसंपादक*
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी / समन्वयक सरपंच परिषद मु़ंबई
आज दिनांक 7 ऑक्टोबर 2022 ला पंचायत समिती सभागृहामध्ये लाखांदूर तालुका सरपंच संघटनेची सभा घेण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील 62 ही ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच उपस्थित होते. लाखांदूर तालुका सरपंच संघटनेकडून काही महत्वाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले.
मागण्या :-
1 ) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कुशल व अकुशल कामाची देयके मागील दोन वर्षापासून शासन स्तरावरून मिळाली नसल्याने तालुक्यातील 62 ही ग्रामपंचायतीचा कुशल व अकुशल कामावर सन 2022-23 ला बहिष्कार टाकणे.
2 ) ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे अशा ग्रा.पं. मध्ये प्रशाशक न ठेवता सरपंच पदाला मुदतवाढ देण्याबाबद.
3 ) 15 वित्त आयोगाचा निधी हप्त्याने जमा न होता एकदाच सरसकट वार्षिक निधी मिळण्याबाबद मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जितू पारधी, अरुण गजभिये, मंगला शेंडे, प्रमोद प्रधान, शैलेश रामटेके, सुमेध रामटेके, सविता लेदे, गटविकास अधिकारी व सर्व तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी यांचे मार्फत एकनाथजी शिंदे
मुखमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, परिणय फुके साहेब, विधान परिषद सदस्य, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, मुख्याधिकारी साहेब, जिल्हा परिषद भंडारा, तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय लाखांदूर यांना निवेदन देण्यात आले.
0 Comments