Advertisement

वाडीबार ते बेंडाकुंड रस्त्याची दुरवस्था न झाल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा

वाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खडी व मोठ-मोठे दगड असल्याने या मार्गावरून वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना चालणे देखील मुष्किल झाले आहे.
रस्ता अभावी अनेक वाहनधारकांना मोलगी ला व तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्या साठी बेडाकुंड, साकलीउमर असा लांबचा फेरा असलेल्या मार्गाच्या वापर करीत असल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावे लागत आहे.

वाडीबार ते बेडाकुंड या रस्त्यावर गेल्या दहा-बारा वर्षांपासून खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. डांबरीकरण अभावी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना रस्त्यावरील खडी मोठे दगड पडूनच असल्याने या रस्त्यावरून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रासदायक असल्याने रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने अक्कलकुवा-मोलगी या मुख्य रस्त्यावर वाडीबार फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे गणेश पाडवी, प्रा. साऱ्या पाडवी, धिरसिंग वळवी, संजय वळवी, बाजीराव पाडवी, के. के. वळवी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments