Advertisement

महात्मा राजा रावण व राजा महिषासुर यांच्या पुतळ्याचे दहन प्रथा बंद करण्यात यावे असे रावण ग्रुप महा राज्य यांनी मागणी केली


*ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्हा:-*
रावण दहन कुप्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी आज दिनांक 27 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी मॅडम मनीषा खत्री व नंदुरबार तालुका पोलिस स्टेशन यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, रावण ग्रुप महाराष्ट्र राज्य, व वीर एकलव्य आदिवासी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
*विषय:-* महात्मा राजा रावण मडावी व बलशाली राजा महिषासुर हे आदिवासी समाजाचे पूर्वज आहेत व समस्त आदिवासी समाजामध्ये आस्था आहे व अखंड भारतात बरेचशा ठिकाणी मंदिरे देखील आहे तसेच तामिळनाडू मध्ये 352 मंदिरे आहेत व सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशातील मंदौसर येथे आहे. तरीदेखील काही धार्मिक संघटना, व नवरात्र मंडळाच्या वतीने दसरयाच्या दिवशी पुतळ्याचे दहन करण्यात येते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या सन्मानाला जाणुन बुजुन ठेस पोहचवुन भावना दुखावल्या जातात. तरी Atrocity Act नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. यावेळी उपस्थित वीर एकलव्य आदिवासी सेनेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ पाडवी रावण ग्रुपचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष निलेश भाऊ पावरा, जुनमोहिदे अध्यक्ष अभिमन भाऊ भिल, उपाध्यक्ष समाधान भाऊ सोनवणे, सुनील भिल व आदिवासी महासंघाचे सोमनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments