Advertisement

आरोपी गौरव चौधरी सोबत खासदार हिना गावीत

आदिवासी महिला कर्मचारीस आरोपीने केली होती मारहाण 

प्रहार शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात आरोपी व खासदार एकत्र 

बिरसा फायटर्स आक्रमक, नोंदवला निषेध 

नंदूरबार:निशा पावरा या आदिवासी महिला तलाठीस भाजपा नंदूरबार चे नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.या प्रकरणात आदिवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपी नगरसेवक गौरव चौधरीला तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.आदिवासी संघटनांच्या आंदोलनांच्या इशा-यामुळे पोलीस प्रशासनाने आरोपी नगरसेवकावर गुन्हा दाखल करुन अटक केली होती.दरम्यान या प्रकरणात आरोपी नगरसेवकास बरेच दिवस पोलीस कोठडीत व जेलमध्ये ठेवण्यात आले होते. एवढे मोठे प्रकरण घडले तरी नंदूरबारच्या भाजपा महिला खासदार हिना गावीत यांनी याबाबत एक शब्दही काढला नव्हता, कारण आरोपी हा भाजपा पक्षाचा होता. हिना गावीत खासदार ह्या आदिवासी महिला खासदार असून आदिवासी महिलेस मारहाण झाली तेव्हा तोंडातून भ्र सुद्धा काढला नाही,म्हणून आदिवासी जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती व आरोपी नगरसेवकास हिना गावीत ह्या वाचवत आहेत, असा आरोप काही आदिवासी संघटना पदाधिका-यांनी केला होता.
            मारहाण प्रकरणात आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी खासदार हिना गावीत यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती.मात्र ही शंका आता खरी ठरली आहे.प्रहार शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या एका जिल्हा मेळाव्यात आरोपी गौरव चौधरी सोबत हिना गावीत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. फोटोत आरोपी गौरव चौधरी व खासदार हिना गावीत ह्या जवळ बसून हसत आहेत.संपूर्ण कार्यक्रमात आरोपी सोबत हिना गावीत यांची जवळीकता फोटोतून दिसून आली.यावर बिरसा फायटर्स संघटनेने आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला आहे.
           निशा पावरा या आदिवासी महिलेस मारहाण करणारा गौरव चौधरी हा भाजपाचा नगरसेवक हिना गावीत खासदार सोबत बिनधास्त बसला आहे.अशे राजकारणी असतात, आदिवासी महिलेला मारहाण झाली तेव्हा एक शब्द न काढणारी हिना गावीत ह्या आरोपीसोबत फोटो काढत आहेत. यातून हे सिद्ध होत आहे की,हिना गावीत यांना आपल्या आदिवासी समाजापेक्षा आपला पक्ष महत्वाचा आहे.प्रहार शिक्षक संघटनेने हिना गावीत यांना बोलावले हे ठिक आहे.आम्हास काही आक्षेप नाही.परंतु आरोपी गौरव चौधरीला का बोलावले?जो हिना गावीत जवळ बसून फोटो काढतो आहे? यातून प्रहार संघटनेला काय संदेश द्यायचा आहे? असा सवाल उपस्थित करत सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी निषेध व्यक्त केला आहे.
                या केसमध्ये आमच्या संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.आदिवासी महिला निशा पावरा यांना मारहाण प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ,परंतु हिना गावीत खासदार व प्रहार संघटना पदाधिकारी आरोपी गौरव चौधरीला जवळ घेत पाठीशी घालत आहेत.असा आरोप सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.गोपाल गावित आदिवासी असून प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, यांना आपल्या आदिवासी समाजातील बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा विसर पडला आहे का?असा प्रश्न उपस्थित करत संघटनेच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.

Post a Comment

0 Comments