Advertisement

शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करा: बिरसा फायटर्सची मागणी

*बोगस नियुक्त्यांत संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे साटेलोटे: सुशिलकुमार पावरा*

दापोली: शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या व मान्यतांची ईडीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, संजय दळवी सचिव, दादाजी बागुल महानिरीक्षक, गणेश खर्डे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष, जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख, भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, आकाश पवार बागलाण तालुकाध्यक्ष, उमाकांत कापडणीस जिल्हाध्यक्ष नाशिक, विजय सहारे कार्याध्यक्ष नाशिक, सतीश जाधव जिल्हाध्यक्ष ठाणे,कृष्णा भंडारी जिल्हाध्यक्ष पुणे,वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे,विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शासनास निवेदन पाठवली आहेत. 
                        निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या आणि मान्यता होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा बोगस नियुक्त्यांत संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे साटेलोटे असून सुमारे 1 हजार कोटी रूपयांहून मोठा हा महाघोटाळा आहे.या प्रकरणात पोलीस अथवा इतर यंत्रणाच्या माध्यमातून नीट चौकशी होऊ शकणार नाही.त्यामुळे त्याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी.
               राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात चाललेल्या अनागोंदी कारभाराने विद्यार्थी व शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.टीईटी घोटाळ्याचे लोण राज्यभर पसरले आहेत.इलाहाबाद व आग्रासारख्या विद्यापीठातून पैशांनी बी.एड.च्या पदव्या विकत घेऊन बोगस पदव्यांआधारे लाखो नोक-या बळकावल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. त्या बोगस शिक्षक व शिक्षण विस्तार अधिका-यांवर कारवाई प्रलंबित आहे.बोगस नियुक्तीधारकांवर कठोर कारवाई होणे,ही आजची काळाची गरज आहे.
         राज्यातील शाळांमध्ये शासन निर्णय 2 मे 2012 नंतर बोगस शिक्षक नियुक्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.यात संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक सुद्धा शामिल आहेत. बोगस शिक्षण नियुक्तीत शेकडो रूपयांची उलाढाल झाली असावी.ही एक गंभीर बाब असून यामध्ये नियुक्ती ,मान्यता,शालार्थ आयडी प्रकरणात दोषी असलेल्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,त्यासाठी या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments