Advertisement

आदिवासी अल्पसंख्यांक नेते मंगेश औताडे यांनी घेतली विविध मंत्र्याची भेट

कोपरगाव प्रतिनिधी
   विठ्ठल वाघ

एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य विजयकुमार गावित,व माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांची भेट घेण्यात आली.याप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे नवनाथ वाघ, राजू वाघ, बंडू पवार,शोभा सोनवणे,संकेत सोनवणे,अनिकेत सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी आदिवासी नेते मंगेश औताडे यांनी आदिवासींच्या विविध समस्यावर हक्क अधिकार च्या प्रश्नावर तसेच कोपरगाव तसेच महाराष्ट्रातील आदिवासी भागातील गायरान, घरकुल योजना,आदिवासींना जागेचा प्रश्न, मंजुर हत्याकांड, तालुका तेथे एकलव्य पुतळा, आदिवासी तसेच बहुजन समाजातील गोरगरीब नागरिकांचे आरोग्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, खावटी योजना, अशा अनेक मुद्द्यावर मंगेश औताडे यांनी आदिवासी मंत्री विजयकुमार गावित, नरहरी झि रवळ यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. 
आणि येत्या काळात या प्रश्नावरती काही एक कारवाई झाली नाही तर भव्य दिव्य स्वरूपाचे जन आंदोलन उभे करू असा इशाराही देण्यात आला.तसेच पोलीस आयुक्तालय येथेही भेट देण्यात आली आणि विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments