Advertisement

डाॅ.निलेश पाटील यांच्यावर अस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी


*भंगार अम्बुलन्स दुरुस्तीच्या मागणीवरून आदिवासी ड्रायव्हरचा छळ*


अक्कलकुवा: भारत विकास गृप  कंपनीचे नंदुरबार जिल्ह्याचे व्यवस्थापक डाॅ.निलेश पाटील यांच्यावर अस्ट्रासिटी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी,अशी मागणी जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार व पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे मोलगी तालुका अक्कलकुवा यांच्याकडे प्राध्यापक संपत वसावे तालुकाध्यक्ष अक्कलकुवा तथा जिल्हा प्रवक्ता नंदुरबार यांनी एका तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.
         या तक्रारीत म्हटले आहे की,108 मोलगी अति दुर्गम भागातील 2014 पासून कार्यरत असलेले ड्रायव्हर शंकर सायजा तडवी यांनी निलेश पाटील यांच्याकडे गाडी दुरुस्तीची मागणी  केली असता त्यांनी ड्रायव्हर शंकर तडवी यांचा पगार सुडबुद्धिने कमी टाकला.आपल्याला पगार कमी का टाकला अशी विचारणा केल्यावर" अक्कलकुवाला ड्यूटी कर,जास्त बोलू नको,तू खालचा आहे".अशी धमकीची भाषा केली व वारंवार फोन करणे,धडगांवला गाडी असताना धडगांवला जाणीवपूर्वक त्रास द्यायला पाठवणे,पुन्हा अर्धा रस्त्यातूनच अक्कलकुवाला पाठवणे,अशा प्रकारे ड्रायव्हरला छळायला सुरुवात केली आहे.
         तसेच डाॅ.निलेश पाटील व ड्रायव्हर रवि गिरासे यांना स्थानिक संवादाकरिता आदिवासी बोली भाषा येत नाही,तरी ड्रायव्हर रवि गिरासे यांची मोलगी या आदिवासी क्षेत्रात जाणीवपूर्वक नियुक्ती करत आहेत. निलेश पाटील व रवि गिरासे हे दोघे एकाच गावातील असल्यामुळे आपल्या मित्राची चांगली सोय व्हावी यासाठी शंकर तडवी या आदिवासी ड्रायव्हरला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली आहे.म्हणून बी.व्ही.जी.कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांच्यावर अस्ट्रासिटी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
         दरम्यान सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना  डाॅ.निलेश पाटील यांचा एक दलाल ड्रायव्हर लाजरस गावित यांनी निलेश पाटील विरोधात तक्रार केल्यास शंकर तडवी यांनाच त्रास होईल,अशी चाटूगिरी फोनवर केल्याचे दिसून आले.आदिवासी माणसाची बाजू न घेता निलेश पाटील याची दलाली करणा-या  लाजरस गावीत या ड्रायव्हरबद्धल आदिवासी जनतेने संताप व्यक्त केला आहे.
        डाॅ.निलेश पाटील यांना जिल्हा व्यवस्थापक यांच्यावर अस्ट्रीसिटीचा गुन्हा दाखल करुन  तात्काळ अटक करण्यात यावी व पदावरून हाकलपट्टी करण्यात यावी,अशी मागणी करत बिरसा फायटर्स पदाधिकारी या प्रकरणात आक्रमक झाले आहेत. आदिवासी बहूल जिल्ह्यात राहून डाॅ.निलेश पाटील सारखा उन्मर्ट माणूस आपल्या मनमानी व हुकुशाही ने आदिवासी लोकांना त्रास देत आहे,हे आम्ही कदापि सहन करणार नाही,याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,नाहीतर आपण आंदोलन सुद्धा करू अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments