दापोली:रामदास कदम हा सिनेमातला व राजकारणातला मोठा डाकू आहे,अशी टिका शिक्षक तथा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स सुशिलकुमार पावरा यांनी रामदास कदम यांच्यावर केली आहे.ज्या पद्धतीने एखादा सिनेमा लोक बघतात, सिनेमातला हिरो जेव्हा डाकूला डीशूम, डीशूम करून बधडतो, तेव्हा प्रेषक म्हणतात, आणखी याल मार,आणखी मार ,मरेपर्यंत मार अशी अपेक्षा करत डाकूचा अंत कधी होतो,याची आतुरतेने वाट प्रेषक बघतात, तशीच आतुरता रामदास कदमच्या बाबतीत आमची आहे,लोकांची व जनतेची आहे.
रामदास कदम हा डाकूसारखाच दिसतो.यांच बोलणं,चालणं,राहणं सुद्धा डाकूसारखाचं आहे.यांच्या तोंडातून नेहमी शिव्या,धमक्या,अर्वाच्च शब्दच बाहेर पडतात,तोंडातून कायम घाणच निघते.अशा माणसाकडून चांगल्याची अपेक्षा जनतेने ठेवू नयेत.
माझ्यासारख्या एका निरपराध शिक्षकाला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे महापाप या पापी माणसाने केले आहे.यांच्यासमोर गुरूजी काय? आई काय? बाप काय? बहिण काय?लहान काय?मोठे काय?या माणसाजवळ बोलण्याची व वागण्याची वैचारिक व राजकीय सभ्यता नाही.
ज्या पद्धतीने परवाच्या दापोली येथील सभेत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,सौ.रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सगळ्या मर्यादा ओलांडून रामदास कदम बोलले,त्यावरून रामदास कदम यांची लायकी जनतेला समजली.रामदास कदमचे खरे रूप जनतेसमोर यायला लागले.उद्धव ठाकरे यांना आपल्या बापावरच शंका आहे, अशी खालच्या पातळीवर येऊन जहरीली टिका केली,यावरून रामदास कदम हा किती निच व वाईट माणूस हे जनतेने पाहिले.
आजपर्यंत रामदास कदम यांनी गुंडगिरीने शिक्षकांना,कर्मचाऱ्यांना,अधिका-यांना,पोलिसांना व न्यायाधिशांना सुद्धा आपल्या सत्तेचा व पदाचा दुरूपयोग करत मनमानी केलेली आहे,त्रास दिलेला आहे.पदाचा व सत्तेचा माज या माणसाला होता.
परंतु रामदास कदमची भाईगिरी,गुंडगिरी,दादागिरी ,डाकुगिरी आता आमच्यासारखे अन्यायग्रस्त कधीच खपवून घेणार नाहीत. यांच्या वाईट कर्माची फळे यांना मिळालीच पाहिजेत. या डाकूरूपी रामदास कदमचा राजकीय अंत झालाच पाहिजे.यांचा पापाचा गळा भरलेलाच आहे.हा कधी फुटतोय,या डाकूचा अंत कधी होतोय?याची जनता व आमच्यासारखे अन्यायग्रस्त वाटच बघत आहोत,अशी प्रतिक्रिया शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 Comments