Advertisement

बिरसा फायटर्सच्या मोर्चा व आंदोलनामुळे प्रशासन घाबरले

*मोर्चातून रत्नागिरीतील आदिवासींची ताकद दिसेल: सुशिलकुमार पावरा*

*कुलगुरू व सुशिलकुमार पावरा यांच्यात 30 मिनिटे चर्चा*

*कृषी विद्यापीठ समोर मोर्चा आणू नका,नियमानुसार कार्यवाही करू: कुलगुरू डाॅ.संजय सावंत* 

*बोगस आदिवासींविरोधात 10 ऑक्टोबरला बिरसा फायटर्सचा मोर्चा व आंदोलन* 

दापोली: बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या.या मागणीसाठी बिरसा फायटर्स तर्फे दापोलीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन होणार आहे.याबाबत कुलगुरू,कोकण कृषी विद्यापीठ दापोली, उपविभागीय अधिकारी दापोली,तहसीलदार दापोली,गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली,पोलीस निरीक्षक दापोली यांना सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी निवेदन दिले आहे.
            आज दिनांक:30 ऑक्टोबर 2022 रोजी या मोर्चा व आंदोलनातील विषयांबाबत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत व सुशिलकुमार पावरा यांच्यात तब्बल 30 मिनिटे चर्चा करण्यात आली.मागण्यांसंदर्भात कागदपत्रे रजिस्टर अधिका-याला द्या,आम्ही योग्य ती कार्यवाही करू,परंतु हा मोर्चा कोकण कृषी विद्यापीठ दापोली समोर आणू नका,असे कुलगुरू डाॅ.संजय सावंत म्हणाले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
             आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा कोकण कृषी विद्यापीठ दापोली,जिल्हा परिषद रत्नागिरी,जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी,सर्व पंचायत समिती ,सर्व तहसिल कार्यालय,पोलीस विभाग,बॅन्का व विविध सरकारी व निमसरकारी संस्थेत बोगस आदिवासी आदिवासींच्या जागेवर नोकरी करत आहेत. काहींनी 40 वर्षे नोकरी करूनही जात प्रमाणपत्र सादर न करता जात प्रमाणपत्राविना सेवानिवृत्त झाले आहेत,काहींना अधिसंख्य करण्यात आले आहेत तर काही कर्मचारी जात पडताळणी समिती व न्यायालय प्रलंबित दावे दाखवून शासनाची दिशाभूल करत नोकरी करत आहेत. 
               कोकण कृषी विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरी भरतीत प्राधान्य द्या,नोकरीवर घ्या.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊ नका,त्यांची सेवा समाप्त करा.खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन अटक करा.
                      या मागण्यांसाठी आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता दापोलीत आझाद मैदान पासून पोलीस ठाणे,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती दापोली,तहसिल कार्यालय मार्गे कोकण कृषी विद्यापीठ दापोली पर्यंत मोर्चा होणार आहे व दुपारी 1 वाजता कृषी विद्यापीठ दापोली समोर ठिय्या आंदोलन होणार आहे,अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments