Advertisement

नाशिक:- आदिवासी विकास भवनात आदिवासी विकास उपायुक्त मा गोलाईत आदिवासी समस्या विषय आढवा बैठक संपन्न झाली


*आदिवासी विकास भवन नासिक येथे आदिवासी विकास उपायुक्त मा.गोलाईत साहेब यांचे उपस्थीतीत आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांचेकडुन विशेष आढावा बैठकीचे आयोजन , आदिवासी समाजातील दुर्लक्षीत व वंचीत "आदिम कातकरी जमातीला समाजाचे मुख्य प्रवाहात आणन्यासाठी आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांचे कडुन या बाबत विशेष आराखडा तयार करण्याच्या सुचना उपायुक्तांसह ईगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी आदिंचे उपस्थित बैठक संपन्न*👍
     *उभाडे ता.ईगतपुरी येथील चिमुरडीचा दुर्देवी म्रुत्यु व कातकरी वस्तीतील बालकांची कवडीमोल भावात होणारी सर्रास विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्व स्तरातुन संताप व हळहळ व्यक्त केली गेली व प्रशासन हि खडबडुन जागे झाले आहे .*
    *अंगावर पुरेसे कपडे नाही खायला पोटभर अन्न नाहि डोक्यावर छप्पर नाहि उघडी/नागडी फिरनारी लेकरांना शिक्षण नाहि , आजचे आधुनिक विज्ञान युगात व २१ व्या शतकातहि असे हालाखीचे जिवन जगनारा "आदिम कातकरी" हा समाज नेहमीच विकासापासुन वंचीत व दुर्लक्षित राहिला आहे .*
  *आदिवासी (अनु.जमाती) या प्रवर्गाकरीता शासनस्तरावर विविध योजना असुनहि शासनाचे जाचक अटि व चुकीचे धोरनामुळे कातकरी समाज नेहमीच लाभापासुन वंचीत राहिला आहे आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांनी बाबत चिंता व्यक्त केली आहे या सर्व गोष्टिंवर सखोल अभ्यास करून हा प्रश्न कसा सोडविता येईल असे गैरप्रकार कसे रोखता येतील या बाबत सुचना मांडल्या . पोटचे लेकरांना विकण्याची वेळ या कुटुंबावर का आली ? अजुन अशी किती कुटुंबे आहेत? कीती स्थलांतर झाले ? किती बालमजुरांचे अशाच प्रकारे शोषन सुरु आहे ? अशा अनेक प्रश्नांचा जाब विचारीत व भडीमार करीत आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांनी प्रशासनाला धारेवर धरले .*
   *तालुका स्तरावर समीती तयार करने , ईगतपुरी/ त्रंबकेश्वर तालुक्यातील सर्व कातकरी वस्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे आधारकार्ड , रेशनकार्ड काढणे , विज/पाणी/रस्ता अशा मुलभुत गरजा त्यांचे लोकवस्ती पर्यंत पोहचविणे , मुलांचे प्राथमीक शिक्षणासाठी शाळा, अंगणवाडी सुरु करने तसेच २००९ पासुन वास्तव्य असलेल्या वनविभाग ई.शासकिय भुखंडावर कायमस्वरुपी पक्कि घरे बांधुन देणे .ईत्यादि बाबि आ.खोसकर साहेब यांनी मांडल्या कातकरी समाजाचे स्थलांतर थांबविण्यासाठी दिर्घकाळ क्रुती आराखडा तयार करणे कामी २ आठवड्याचे आत समीती गठीत करणार असल्याचे मा.उपायुक्तांनी सांगीतले या समीतीमध्ये तलाठी , ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटिल, आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक ईत्यादिंचा समावेश असेल .* 
      *कातकरी समाजातील बहुतांश विकासापासुन वंचीत असलेल्या घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी कर्तव्यदक्ष आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांनी कंबर कसली असुन जो पर्यंत या आदिवासींचे प्रश्न मार्गी लागत नाही तो पावेतो शांत बसनार नाहि अशी प्रतीक्रीया आ.खोसकर साहेब यांनी दिली असुन या बाबत सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करनार असल्याचे सांगितले .*
     *"कातकरी" समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पोटतिडकीने आ.खोसकर साहेब यांची धडपड सुरू असुन आदिवासींच्या खर्या वेदना व दु:ख समजुन घेण्यासाठी आदिवासीचे पोटि जन्म घ्यावा लागतो हे निश्चित.👍👏*

Post a Comment

0 Comments