Advertisement

बिरसा फायटर्स राज्यात 6 व्या क्रमांकावर

*बिरसा फायटर्सचे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश*

13 सरपंच निवडून आल्याचा दावा

राज्यात काही राजकीय पक्षांना बिरसा फायटर्सने मागे टाकले 

दापोली: बिरसा फायटर्स या आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनेतील पदाधिका-यांनी ग्रामपंचायत 2022 निवडणुकीत आपले घवघवीत यश संपादन केले आहे.राज्यातील एकूण 547 ग्रामपंचायतीसाठी निवडणुक घेण्यात आली.त्यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून बिरसा फायटर्सच्या पदाधिका-यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक लढविली.दिनांक 19 सप्टेंबर रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला.
            जोयदा ग्रामपंचायत मधून सौ.शिला मनोज पावरा ह्या बिरसा फायटर्सच्या पहिल्या सरपंच आपल्या बिरसा मुंडा पॅनेलच्या एकूण 9 सदस्यांसह निवडून आल्या.शिला मनोज पावरा ह्या बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा यांच्या पत्नी आहेत.बिरसा फायटर्सचे प्रशांत पटले जिल्हा महासचिव नंदुरबार ,शहादा तालुका कार्याध्यक्ष निलेश सुळे,शहादा तालुका संपर्कप्रमुख प्रेमसिंग भोसले हे शहाद्या तालुक्यातील चांदचैली,लंगडी भवानी,खरगोन अशा ग्रामपंचायत मधून प्रचंड मतांनी निवडून आले.
            नंदूरबार जिल्ह्यातून एकूण 4 व धुळे जिल्ह्यातून 9 असे एकूण 13 सरपंच आपल्या संघटनेचे पदाधिकारी निवडून आले, असा दावा बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी केला आहे.निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी अभिनंदन केले आहे.त्याचबरोबर बिरसा फायटर्सच्या पदाधिकाऱ्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षांत करण्यात आला आहे.
         547 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा 300,राष्ट्रवादी 126,काँग्रेस 62,शिंदे गट 41,शिवसेना 37 तर बिरसा फायटर्स 13 ग्रामपंचायत वर बाजी मारली आहे,असा दावा करण्यात आला आहे.बिरसा फायटर्स ही सामाजिक संघटना असून काही राजकीय पक्षांना मागे टाकत ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली,म्हणून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.राज्याच्या निवडणुकीत बिरसा फायटर्सच्या उमेदवारांना पसंती मिळू लागल्यामुळे आता पुढच्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांकडे लोकांचे लक्ष लागले आहेत.

Post a Comment

0 Comments