Advertisement

50 वर्षांत एकालाही नोकरी नाही!भरती प्रक्रियेवरच सवाल


दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचा आदिवासींना काय फायदा ?सुशिलकुमार पावरा यांचा कुलगुरूंना सवाल

*नोकरी मिळाली तरच रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहात येईल* 

बोगस आदिवासींवर कारवाईचा अधिकार आम्हाला नाही: कुलगुरू डाॅ.संजय सावंत 

*कुलगुरूंच्या नकारात्मक बोलण्यावरून पावरा नाराज; मोर्चा व आंदोलन होणारच* 

दापोली:डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 18 मे 1972 रोजी स्थापन करण्यात आले,विद्यापीठ स्थापन होऊन 50 वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही आदिवासी उमेदवाराला नोकरीवर घेण्यात आले नाही,ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचा येथील आदिवासींना काय फायदा झाला? असा सवाल उपस्थित करत सुशिलकुमार पावरा यांनी कोकण कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेवरच सवाल उपस्थित केले आहेत. 
                           बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या.या मागणीसाठी बिरसा फायटर्स तर्फे दापोलीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी मोर्चा  व ठिय्या आंदोलन होणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी या मोर्चा व आंदोलनातील विषयांबाबत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत व सुशिलकुमार पावरा यांच्यात तब्बल 30 मिनिटे चर्चा करण्यात आली.मागण्यांसंदर्भात कागदपत्रे रजिस्टर अधिका-याला द्या,आम्ही योग्य ती कार्यवाही करू,परंतु हा मोर्चा कोकण कृषी विद्यापीठ दापोली समोर आणू नका,असे कुलगुरू डाॅ.संजय सावंत म्हणाले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
                 कोकण कृषी विद्यापीठात एकुण 9 बोगस आदिवासी कर्मचारी आहेत,काही सेवानिवृत्त झाले आहेत, काहींना अधिसंख्य करण्यात आले आहे,या बोगस कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासन कारवाई का करत नाही? असा सवाल सुशिलकुमार पावरा यांनी कुलगुरू डाॅ.संजय सावंत यांना केला.त्यावर कुलगुरू म्हणाले की,अशा लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.बोगस लोकांवर सरकारने कारवाई करायला पाहिजे.आम्ही नियमानुसार आमची कार्यवाही करत आहोत,यापुढे जात प्रमाणपत्रा विना एकही उमेदवार विद्यापीठात नोकरीवर घेतला जाणार नाही,याची दक्षता आम्ही घेऊ.50 वर्षांत एकही स्थानिक आदिवासी उमेदवार नोकरीवर नाही; याला विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही.तुमच्या समाजकार्यास शुभेच्छा!
                    कोकण कृषी विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरी भरतीत प्राधान्य द्या,नोकरीवर घ्या.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊ नका,त्यांची सेवा समाप्त करा.खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन अटक करा.
                      या मागण्यांसाठी आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता दापोलीत आझाद मैदान पासून पोलीस ठाणे,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती दापोली,तहसिल कार्यालय मार्गे कोकण कृषी विद्यापीठ दापोली पर्यंत मोर्चा होणार आहे व दुपारी 1 वाजता कृषी विद्यापीठ दापोली समोर ठिय्या आंदोलन होणार आहे,अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments