Advertisement

बिरसा फायटर्सचा जागतिक आदिवासी दिन हाऊसफुल्ल


*आदिवासी सांस्कृतिक रॅली ठरली आकर्षक* 

*बिरसा मुंडा की जयचा नारा शहरात गुंजला* 

*दीपप्रज्वलन चिमुकल्या क्रांतीकारकांच्या हस्ते* 

*आदिवासी वादळ नृत्याला बक्षिसांचा वर्षाव*


दापोली : 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दापोलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी साडे अकरा वाजता दापोली शहरात आदिवासी सांस्कृतिक रॅली काढण्यात आली.रॅलीत कुडावळे येथील बालकलाकारांनी क्रांतीकारक बिरसा मुंडा,नाग्या कातकरी यांचे रुप सकारले,हॅरी पावरा यांनी राघोजी भांगरे,रोहन वळवी यांनी विर एकलव्य व परी पावरा यांनी  राणी झलकारीबाईच्या रूपात लोकांचे लक्ष वेधले.क्रांतीवीर बिरसा मुंडा की जय,नाग्या कातकरी की जय,राघोजी भांगरे अमर रहे,जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो,एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान, भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
                          बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सांस्कृतिक रॅलीत बिरसा फायटर्सच्या जिल्हाध्यक्षा चंद्रभागा पवार,कार्याध्यक्ष संदिप पवार, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे  तालुकाध्यक्ष विठोबा जगताप,केंद्र प्रमुख गुलाबराव गावीत,राजेंद्र पाडवी,अरूण वळवी,गुलाबराव अहिरे,पिंगला पावरा इत्यादीं आदिवासी कर्मचारी सहभागी झाले.या रॅलीत कुडावळे,शिरखल, माटवण, जामगे,शिरखल इत्यादीं गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅलीत आदिवासी बांधवांनी आदिवासी पोशाख परीधान केले होते.त्याचबरोबर महिलांनी  आदिवासी दागिने घातले होते. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील, पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी आर.एम.दिघे,गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, दापोलीचे कृषी अधिकारी खरात, शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे,दापोली पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सांगडे, राठोड,परकार, भुसारे इत्यादी अधिकारी सहभागी झाले.घरोघरी तिरंगा संबंधित घोषणाही देण्यात आल्या.
                             पेन्शनर्स हाॅल दापोली येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा,नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.दीपप्रज्वलन चिमुकल्यांच्या क्रांतिकारकांच्या हस्ते करण्यात आले.गटविकास अधिकारी व उपस्थित अधिका-यांनी दीपप्रज्वलनाचा आपला मान हा चिमूकल्या क्रांतिकारकांना दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पद्मन लहांगे यांना देण्यात आले.गुलाबराव गावीत यांनी अनुमोदन दिले.यावेळी आदिवासी माझे बांधव आहेत ही आदिवासी प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिक रित्या म्हटली. नेयू भुलजी हे आदिवासी भाषेतील धरतीमाता पूजन गीत सुशिलकुमार पावरा यांनी आपल्या मधून आवाजात गायले.त्यानंतर आओ सब भाईओ रे ,बहनो रे हे आदिवासी स्वागत नृत्य सादर केले.त्यानंतर मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते चंदू कोकतरे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व आदिवासी क्रांतीकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यावर मार्गदर्शन केले. दहावी ,बारावी, पदवीधर,उच्च पदवी व शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय विद्यालय परीक्षा, विविध स्पर्धेत प्राविण्य  मिळवलेल्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा व विविध पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन बिरसा फायटर्स दापोली तर्फे सत्कार करण्यात आला.
                         आलयं आदिवासी वादळ, आदिवासी राजा,आदिवासी राणी इत्यादी सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर करण्यात आले.आलयं आदिवासी वादळ या नृत्यातील कलाकारांचा अडीच हजार पेक्षा अधिक रोख रक्कम देऊन कौतुक करण्यात आले.जिल्हा कोर्टचे वकील सतीश नाईक यांनी आदिवासींचे हक्क व अधिकार याबद्दल प्रबोधन केले.आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण सगळ्यां कातकरी बांधवांनी साथ द्या,आमची तुम्हाला साथ राहील,कार्यक्रमाला एवढी अफाट संख्या बघून मला खूप आनंद होत आहे.अशीच आदिवासींची एकजूट ठेवा,असे आवाहन पद्मन लहानगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिलकुमार पावरा व आभार प्रदर्शन गुलाबराव अहिरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments