Advertisement

दुर्गामुर्तीसोबत आदिवासीचे गोंड वाणा आराध्य महिषासुरमुर्ती न लावता दसर्याला रावन दहन प्रथा बंद करण्यात यावे

बिरसा फायटर्सचे गोंदिया जिल्हा शाखेचे पोलीस स्ष्टेशन पोलीस निरिक्षक तिरोडा यांना निवेदन 


एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


तिरोडा (२४आँ)महिषासुर मूर्ती दुर्गासोबत न लावता गोंडवाना सम्राट महादेव भक्त यांची प्रति कॄती दसर्याला जाळल्यास बिरसा फायटर्स आंदोलन करेल.म्हणुन पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक तिरोडा याना निवेदन दिले अश्या आसयाचे निवेदन देतांनी विदर्भ प्रदेशाध्यक्ष शामरावजी उईके, वि. महासचिव राकेश सोयाम,जिल्हा अध्यक्ष गोंदिया भोजराज उईके, तिरोडा तालुकाध्यक्ष,दिलीप कोडवते महिलाध्यक्ष सारिका मळकाम संजय धुर्वे ता.अध्यक्ष बिरसाब्रिगेड राकेशजी कुंभरे, तालुका युवाध्यक्ष,सलीराम मरस्कोल्हे सचिव,युवाचे लिलाधर परतती समाज बांधव हजर होते. या हिंसक वाईट प्रथा वेळीच बंद कराव्यात कारण आदिवासी मूल निवासी पुर्वजराजा महिषासुर
आदिवासी असल्याने समाजाचा तो देव आहे व त्याला पुजतात व आमच्या आदरनिय शिवभक्तांचे कुणी सार्वजनिक अपमान करेल तर अशा मंडळ समित्या संस्थावर अँट्रोसिटी अँक्टनुसार बिरसा फायटर्सचे वतीने गुन्हे नोदवतिल व संघटणा रस्त्यावर उतरून विरोध करतील. अशा आराध्य रावन राजाचे पुतळे जाळल्यास व समाजाच्या भावना दुखविल्यास समाजात आक्रोश निर्माण होईल म्हणुन वाईट प्रथा परंपरा विरूध्द कार्य करणारां विरूध्द प्रशासनाने वेळीच दखल घेवून व त्यांची पुजा वाया जावू नये.असे सार्वजनिक हिंसकप्रकार योग्य नाहीत. भारतीय संविधान अनुच्छेद १५ मध्ये धर्म मुलवंश, जाती लिंग, समान आहेत त्यांचे रक्षण झाले पाहीजेत.यापुढे अशा कुप्रथा धर्मनिरपेक्षतेला तडा देतात.विश्व महाप्रतापी दशग्रीव दशविद्या प्राप्त गोंडराजा रावन आदिवासी गोंगो गणातील गोंड राजा आहे. तो अनुसुचित जमात समुदाय देव मानतो.शासनाला अवगत व्हावया स आधीच निवेदनातून कळविले अाहे

Post a Comment

0 Comments