Advertisement

वेळापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे आदिवासींचे जीवनमान धोक्यात - नवनाथ वाघ


कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे काल दि ७.८.२०२२ रोजी अतिवृष्टी ढगफुटी पाऊस झाल्यामुळे बहुसंख्य आदिवासींच्या घरात पाणी शिरले असून आदिवासींच्या घरांन नजदीक असणारा बंधारा फूटून गेल्याने आदिवासींचा जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे यामुळे आदिवासी समाजामध्ये हळहळ व्यक्त होत संतापाची लाट पसरली आहेत बंधारा फूटाचे कारण असे आहेत की वारंवार यासंदर्भात वेळापूर ग्रामपंचायत ग्राँमसेवक पगारे व कमिटी यांना सागितले होते की बंधारा जिथे खचला असेल तिथे तुम्ही भर टाकावे . असे निवेदन देखील दिले होते मात्र ग्रामसेवक व कमिटीने या कडे लक्ष न देता जाणून बुजून दुर्लक्ष केले यामुळे तर वेळापूर येथील आदिवासींवर आज पाण्यात राहण्याची वेळ आली मागील वर्षी पण आशीच अवस्था झाली होती तेव्हा 32 ते 33 कुटुंब चार-पाच दिवस पाण्यात होते तेव्हा उपसरपंच श्री सतिष बोरावके यांनी आदिवासी समाजाला आसे आश्वासन दिले होते की आम्ही या अहवाल वरती पाठू व मा . श्री पक्षश्रेष्ठी कोल्हें साहेब यांच्याकडून मदत घेऊन जेसीबीच्या साह्याने बंधारा जिथे खचला असेल तिथे भर टाकायला लाऊ असे उपसंरपच श्री .सतिष बोरावके यांनी सांगितले होते तरी देखील या कडे काहीच लक्ष दिले नाही . त्याचवेळेस काही आदिवासीच्या घरात पाणी शिरले होते व बहुसंख्य आदिवासींचा संसार वाहून गेला होता तलाठ्यांना आदेशानुसार पचंनामा करायला सांगितले होते मात्र पंचनामा होऊन आजपर्यंत अद्याप या त्या लोंकाना मदत मिळाली नाही ही शोकांतिका वाटते अशी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी केले आहेत. तसेच नवनाथ वाघ यांनी वारंवार ग्रामपंचायत यांना निवेदन देऊन देखील अद्याप या निवेदनावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज वेळापूर येथील आदिवासींच जीवनमान धोक्यात आलेले आहेत तसेच यामध्ये असे दिसून येते की आदिवासी समाजाकडे जाणूनबुजून दूर लक्ष करण्यात येत आहेत तसेच मागील वर्षी तहसीलदार चंद्रे यांनी ग्रामसेवकांना आदेश दिला होता की आदिवासी समाज बांधवांना राहण्यासाठी तात्काळ जागा द्यावे आसा अहवाल किंवा ग्रामसभेचा ठराव घेउन तयार करून वरिष्ठांना पाठवावे .तरी सुद्धा या कडे ग्रामसेवक पगारे व कमिटी यांनी जाणूनबुजून दुर केले आहे असे दिसून आले आहे असे साडेतोड कोचक टीका नवनाथ वाघ यांनी केली आहे तरी देखील शासनाने यांची लवकरात लवकर दखल घेऊन आदिवासीच्या घराची व शेतीची पाहनी करून लवकरात लवकर पंचनामे करून त्या लोंकाना तात्काळ मदन मिळावी आसे एकलव्य आदिवासी परिषद सघटनेचे संस्थापक मा. श्री मंगेश औताडे यांनी शासनाला अहवानआहे केले आहे न्याय न मिळाल्यास येत्या काळामध्ये वेळापूर येथील आदिवासींसाठी खूप मोठा संघर्ष उभा करून तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडले जाईल असा इशारा आमच्या माध्यमांशी बोलताना संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिला आहेत

Post a Comment

0 Comments