Advertisement

आदिवासी महिलेस जातीवाचक शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याने अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दर्ज.

          गोंदिया जिल्हात चिचटोला गावी आदिवासी महिलेस जीवे मारण्या ची धमकी,व शिविगाळ केल्याची बिरसा फायटर्सकडे आली तक्रार.

 
एसके जी पंधरे :- राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ


अर्जुनी/ सडक (७ आँगस्ट) डुग्गीपार पोलिस स्टेशन तक्रारिच्या नुसार घटणा असी की चिचटोला येथील आदिवासी महिला सुनिता हिरालाल वाढवे ३२ वर्षे जातगोंड चे तक्रारीवरून गैरअर्जदार (१) किसन भाष्कर कापगते,(२) भाष्कर अंताराम कापगते (३ ) प्रणय पितांबर कापगते,(४) तेजराम अंताराम कापगते,(५) हेमराज शालीकराम कापगते(६) कु योगिता भाष्कर कापगते,हे सर्व चिचटोला त.अर्जुनी / सडक असे आहेत.यांनी दि २/८/२२ ला नागपंचमीचे दिवसी ट्रक्टरचे २०० रूपये ट्रक्टर भाड्याचे पैशाच्या उदारी वरून
संबंधीतानी सार्वजनिक रित्यापणे खैरलांजी हत्याकांडा ची आठवन करून जीवेमारून अश्लिल व जातिवाचक शिवि देत धमकी दिली. यामुळे भांडणात हस्तगत व वाद विवाद करणारावर भारतीय दंड संहिता,१८६० अंतर्गत कलम,१४३ २९४,३५८,३२३,५०६,अनु सुचित जाती व जमाति अन्याय अत्याचार प्रतिबंधक (अधिनियम)
१९८९ 3(1) ( r), 3(1)(s),3(2)(va) या कलमाअन्नवे गुन्हा नोंद झाला आहे. संबंधीतांचे दि ३ / ८ रोजी अन्यायग्रस्त आदिवासी पो स्टेला महिलेची तक्रार नोंद होत नसल्याने बिरसा फायटर्सकडे अर्ज करण्यात आला व संबंधित न्याय मिळावा म्हणून पुढिल कार्यवाहीसाठी डुग्गीपारचे पोलिस उपनिरिक्षक सचिन दत्ताञय वांगडेनी चौकशी करून उशिरा का होईना तब्बल ५ व्या दिवसी घटनेची नोंद घेत पोलीस प्रशासनाने अँट्रोसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे दिसून आले. 
 यावर प्रतिक्रिया देतांनी" "बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष "सुरेशकुमार पंधरे"यांनी अन्यायाविरूध्द लढा देण्यासाठी समाजबांधवा सोबत राहून समाजातील  समस्या सोडवा व  ऐकञित येत अन्यायाला वाचा फोडून सहकार्य करण्याची गरज असल्याचा मार्गदर्शक, मोलाचा राजकीय सामाजिक सल्ला दिला आहे.                                                                                                                               

Post a Comment

0 Comments