Advertisement

बिरसा फायटर्स तर्फे आदिवासी गीत गायन व नृत्य स्पर्धा


*9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा फायटर्सचा उपक्रम* 

दापोली: बिरसा फायटर्स तालुका शाखा दापोली जिल्हा रत्नागिरीच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन आदिवासी गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा वैयक्तिक व सामूहिक अशा दोन स्वरूपात घेण्यात येत आहे.या स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट 2022 ते 8 ऑगस्ट 2022 असा ठेवण्यात आला आहे. स्पर्धेचा निकाल 9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनी जाहीर करण्यात येणार आहे.या स्पर्धेत लहान गट वय: 1 वर्ष ते 14 वर्ष ,मध्यम गट वय: 15 वर्ष ते 25 वर्ष ,मोठा व खुला गट वय:26 वर्ष ते 60 पेक्षा अधिक असे एकूण तीन स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. बक्षिसाचे स्वरूप लहान गट,मध्यम गट व मोठा खुला गट (वैयक्तिक व सामूहिक) प्रथम क्रमांक येणा-यास डिजीटल प्रमाणपत्र ,सन्मान चिन्ह व आकर्षक भेट वस्तू,द्वितीय क्रमांक येणा-यास डिजीटल प्रमाणपत्र , सन्मान चिन्ह व आकर्षक भेट वस्तू ,तृतीय क्रमांक येणा-यास डिजीटल प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
              स्पर्धेचे नियम व अटी ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकाने आपले स्वतःचे गायलेले आदिवासी गाणे व नृत्याचा फक्त एक विडीओ मोबाईल किंवा अन्य साधनाने रेकॉर्ड/ शूटींग करून *9665006453* या वाॅटसप नंबरवर पाठवावे.जुने किंवा आधीचे रेकॉर्ड केलेले, अन्य ठिकाणी वापरलेले गाणे किंवा नृत्य स्पर्धेत चालणार नाहीत,चालू कालावधीतच विडीओ चालतील. गाणे किंवा नृत्याचा विडीओ मोबाईल आडवा धरून काढावा.गीत गायनात कुठल्याही संगित वाद्याचा किंवा करावकेचा वापर केला तरी चालेल व नृत्यासाठी रेकॉर्ड गाणे चालेल. गाणे व नृत्य आदिवासी भाषेतीलच असावे.गाण्याचा किंवा नृत्याचा विडीओ कमीत कमी 2 मिनीटे व जास्तीत जास्त 5 मिनिटे असावा.स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट 2022 ते 8 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.या कालावधीनंतर येणारे विडीओ स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धकांचे विडीओ बिरसा फायटर्स संबंधित you tube channel वर upload केले जातीत.विडीओला मिळालेल्या views व like वरून क्रमांक काढले जातील.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार बिरसा फायटर्स महाराष्ट्र पदाधिकारी व सदस्य यांनाच राहतील स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स व राष्ट्रीय कला मित्र यांच्या 9665006463 या वाॅटसप नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments