Advertisement

एकलव्य आदिवासी परिषद संघटना यांच्या पुढाकारातून कोपरगाव तालुक्यात सुरेगाव येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण देशात नव्हे तर जगात साजरा झाला असून हा सण आदिवासी संस्कृती प्रमाणे महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साही साजरा झाला यामध्ये कोपरगाव तालुक्यात एकलव्य आदिवासी परिषदेच्या संघटनेचे वर्चस्व असताना संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने हजारोंच्या संख्येत साजरा झाला! याप्रसंगी सजावट करून सर्व महापुरुषांचे पूजन व भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण पवार,हिरामण नाना त्रिभवण,तालुका पदाधिकारी - संजू गोधडे,गंगा बर्डे,दिपक माळी, बालम राजपूत, पवार,भोला पवार,पंकज जिरे,गणेश वाघ,सागर वाघ,लव माळी, जयराम,प्रकाश बेंडकुळे ,फकिरा माळी,रमेश पवार तसेच कोळपेवाडी, कारवाडी, सुरेगाव, हांडेवाडी, मंजूर, वडगाव, धामोरी, कोळगाव थडी, वेळापूर, कुंभारी, गांजेवाडी, पोहेगाव, शहा, मांढरे वस्ती,चास, देरर्डे,घारी, धनगरवाडी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद या संघटनेची शाखा फलकाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या व पदाधिकारी यांच्या हस्ते 
पार पडले. जिल्हाध्यक्ष अरुण पवार यांनी समाजाला मार्गदर्शन केले व संघटन मजबूत करण्यास सांगितले, तर किरण गांगुर्डे यांनी सांगितले की समाजाला आता एक रुपतेची गरज असून कोपरगाव तालुक्यात आपल संघटन खूप मोठ आहेत. तरीपण आपल्या आज्ञानपणाचा फायदा इथल्या काही राजकीय यांनी घेतला आहे! येत्या काळामध्ये एकलव्य यांचा पुतळा संदर्भात मोठा संघर्ष केला जाईल असे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांनी समाजाला दिले

Post a Comment

0 Comments