Advertisement

के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई स्कूल शिरपूर येथे कृषी प्रधान संस्कृतीचे प्रतीक बैल पोळा सण उत्साहात साजरा...

(शिरपूर)आज दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई स्कूल मध्ये सर्जा राजाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंगावर रंगबिरंगी मखमली झूल शिंगांना रंग व फुगे असे सर्जा राजाचे आगमन झाले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलेश चोपडे व समन्वयक श्री. सागर वाघ यांनी पारंपारिक पद्धतीने बैलांचे औक्षण करून त्यांना नैवेद्य दिला. शाळेचे प्राचार्य श्री निलेश चोपडे यांनी जसे दिव्या विना वातीला पर्याय नाही 
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना शेतीला पर्याय नाही. अशा शब्दात बैलपोळ्याचे महत्त्व विशद केले.शाळेच्या कला शिक्षिका सौ. शितल भदाने यांनी बैल पोळ्याचे महत्त्व, शेतकऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व काय? हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ७ वीचे विद्यार्थी राजवर्धन रंधे व अदिती राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री. निलेश चोपडे,समन्वयक श्री. सागर वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments