Advertisement

"वनवासी" शब्दाला बिरसा फायटर्सचा विरोध


*विधानपरिषदेत आमदारांनी आवाज उठवला*

*वनवासी नाही तर आम्हाला आदिवासी म्हणा: सुशिलकुमार पावरा*

*वनवासी म्हणणा-यांची आता खैर नाही* 

दापोली: वनवासी म्हणजे कोण?वनवासी ही कोणती जात? कायम आम्हाला वनवासी म्हटले जाते?आदिवासी व वनवासी म्हणजे काय?  वनवासीची जात कोणती? या प्रश्नाचे उत्तर मला मंत्रीमहोदयांपासून आज पाहिजे,असा जोरदार आवाज अक्कलकुवा विधानपरिषदचे आमदार आमशा पाडवी यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी सभागृहात उठवला.यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले की,महोदया,वनवासी याचा अर्थ असा की,आम्ही जे वनात राहतो.वनक्षेत्रात राहणारे वनवासी आणि शेडूल्ड ट्राईब मध्ये येणारे आपण साधारणतः आदिवासी म्हणतो.आमच्या चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये वनात फक्त आदिवासी समाजच  राहतो असं नाही तर इतर समाजाचे जे लोक राहतातते आपल्याला वनात राहणा-या गावांमध्ये वनवासी म्हणतात.वनवासी हा शब्द किती वर्ष चालणार आहे.आम्ही वनामध्ये राहतो म्हणजे आम्ही जनावर आहे का?आम्ही माणसे नाय का?हा वनवासी शब्द मागे घ्या.अशी मागणी आमशा पाडवी आमदार यांनी विधानपरिषदेत केली.
              स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासींना ट्राईब,ओबाजिनीज,अँनामिस्ट या नावाने संबोधले जायचे.आदिवासींची ही ओळख स्वातंत्र्य नंतर बदलण्यात आली.काही लोकांनी आदिवासींना वनवासी म्हणून संबोधायला सुरवात केली.तेव्हापासून आदिवासींसाठी वनवासी हा शब्द सर्रास वापरला जातो.देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासीच आहेत. तरी अजूनही आदिवासींना वनवासी म्हणणे चुकीचे आहे.
                   आदिवासींना मूळनिवासीही म्हटले जाते,परंतु आता आदिवासींचे जल,जंगल व जमिन वरील हक्क कमी करण्यात आले आहेत.ब-याच  आदिवासींना जंगलातून हाकलून बेघर करण्यात आले आहे.नवीन वनहक्क नियमावलीत आदिवासींचे जंगलावरील हक्क कमी करण्यात आले आहेत.तसेच आदिवासी समाजातील लोक ही पूर्वीप्रमाणे फक्त वनात राहत नाहीत. खेड्यात व शहरात लोक राहू लागली आहेत. हळूहळू जीवनात अमूलाग्र बदल झालेला आहे.वनवासी शब्दाला आमचा विरोध आहे.जो वनवासी म्हणून आमचा उल्लेख करेल,त्याचा आम्ही तीव्र निषेध करू. म्हणूू आता आम्हाला वनवासी नको आदिवासीच म्हणा,अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments