Advertisement

डेलिशा गावीत वैयक्तिक नृत्यात प्रथम


*तारपा नृत्य प्रथम, गोंडी नृत्य द्वितीय तर कातकरी नृत्य तृतीय*

दापोली: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा फायटर्स तालुका शाखा दापोली मार्फत ऑनलाईन आदिवासी गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा वैयक्तिक व सामूहिक अशा दोन प्रकारात घेण्यात आली.स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2022 असा ठेवण्यात आला होता.या दरम्यान प्राप्त गीत व नृत्य विडीओचे परीक्षण करून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात दापोली येथे विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
                   समूहनृत्य प्रकारात डहाणू येथून आलेल्या आदिवासी तारपा नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. दुस-या क्रमांकावर चंद्रपूर हून आलेले गोंडी नृत्य विजेते ठरले, तर तिस-या क्रमांकावर दापोलीतील कुडावळे येथून आलेले कातकरी नृत्य  विजेते ठरले. वैयक्तिक नृत्य प्रकारात डेलिशा गावीत हीने सादर केलेले आदिवासी कोकणा नृत्य प्रथम क्रमांकावर विजेते ठरले.परी पावरा हिने सादर केलेले आदिवासी स्वागत नृत्य द्वितीय ठरले,तर अस्मिता जाधव हिने सादर केलेले आदिवासी राणी नृत्याने तिसरा क्रमांक पटकावला.आदिवासी गीत गायनात मोठा गट प्रकारात रवींद्र वळवी साक्री जिल्हा धुळे यांनी सादर केलेले धरती पूजन गीत प्रथम ठरले.तर मध्यम गट प्रकारात लक्ष्मण पावरा तिनसमाळ धडगांव जिल्हा नंदूरबार यांनी सादर केलेले पावरा गीत प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले व लहान गटात परी पावरा दापोली जिल्हा रत्नागिरी यांनी सादर केलेले आदिवासी बालगीत प्रथम ठरले.
             डिजीटल प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व आकर्षक भेट वस्तू देऊन विजेत्या स्पर्धकांचं बिरसा फायटर्सच्या राज्यस्तरीय मेळाव्यात यथोचित सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती आयोजक सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.विजेत्या स्पर्धकांचे बिरसा फायटर्स संघटनेने व राज्यातील आदिवासी बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments