Advertisement

सरकारी अम्बुलन्स गेली ऐश करायला,बिरसा फायटर्स आक्रमक

*रुग्णांचे हाल;बिरसा फायटर्सने डाॅक्टरांना धरले धारेकर*

धडगांव:नवीन सरकारी रूग्णवाहिनी ( अम्बुलन्स ) मजा मारायला धडगांव सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱी चालक दिगंबर चटपले,क्लार्क भदाणे सह अनेक मित्रांनी तोरणमाळ येथे रविवारची सुट्टीची संधी साधून नेली.रुग्णांना भंगार अम्बुलन्सने उपचारासाठी धडगांव येथून नंदुरबार येथे नेले.असा धक्कादायक प्रकार बिरसा फायटर्सचे धडगांव महासचिव प्रदिप पावरा यांनी समोर आणला आहे.धडगांव सरकारी रुग्णालयातील अम्बुलन्स रविवारची सुट्टीची संधी साधून रुग्णालयातीलच कर्मचाऱ्यांनी चक्क तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी आपली गर्मी कमी करण्यासाठी नेल्याचे कळताच बिरसा फायटर्स धडगांवचे पदाधिकारी यांनी लगेच धडगांव येथील सरकारी रुग्णालय गाठले.त्या कर्मचाऱ्यांने आपल्या मित्र परिवारासह तोरणमाळ येथे सरकारी अम्बुलन्स सहलीला नेली. तेथे संबंधित अधिका-यांना जाब विचारून चांगलेच धारेवर ठरले.अधिकारी हा सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देत होता,परंतु त्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांने पोल खोलायला सुरुवात केली; तेव्हा अधिकारी नरमला. या सरकारी कर्मचाऱ्यांने आपला प्रामाणिकपणा दाखवत बिरसा फायटर्स धडगांव पदाधिकाऱ्यांना साथ दिली,त्यामुळेच संबंधित अधिकारी चांगलाच हरभडला. 
                            धडगांव सारख्या दुर्गम भागात रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारी दवाखान्यात अनेक सोयी सुविधा शासन करत आहेत; परंतु या सोयी सुविधांचा वापर हे रूग्णांऐवजी तेथील कर्मचाऱीच आपल्या वैयक्तिक जीवनात मजा मारायला करत आहेत, असा आरोप बिरसा फायटर्सचे महासचिव प्रदिप पावरा यांनी केला आहे.त्याला पुरावे प्राप्त झाल्यानंतर आरोप खरे ठरले आहेत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.अनेकदा रुग्ण भंगार अम्बुलन्स मध्ये धडगांव येथून नंदुरबार येथे नेताना मरण पावले आहेत.तरी रुग्णांसाठी भंगार अम्बुलन्स वापरली जाते व चांगली अम्बुलन्स तोरणमाळला मजा मारायला नेली जाते,हे चुकीचे घडत आहे.तोरणमाळ येथे मजा मारायला अम्बुलन्स नेणा-या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा,नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच बिरसा फायटर्स धडगांव शाखेने प्रशासनाला दिला आहे. अम्बुलन्स ह्या रूग्णांच्या सेवा करायला की कर्मचाऱ्यांना मजा मारायला असा सवाल उपस्थित केला जात आहे.तोरणमाळहून धडगांवला आल्यानंतर आतील मजा मारणारे मित्र कर्मचारी फरार झाले.फक्त चालक व क्लार्कच गाडीत सापडले. चालक यांनी मला न विचारता, परवानगी न घेता परस्पर तोरणमाळ येथे अम्बुलन्स नेली,असे लेखी पत्र संबंधित प्रमुख डाॅक्टरांनी बिरसा फायटर्सला दिले आहे. लाखाची अम्बुलन्स रुग्णांसाठी न वापरता ऐश करायला तोरणमाळ येथे नेली म्हणून लोकांत संताप निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments