Advertisement

*राष्ट्राच्या विकासासाठी स्वतःचा सर्वागीण विकास करा.*

प्रशांत नारनवरे यांचे प्रतिपादन : डव्वा निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसी संवाद 

गोदिंया प्रतिनिधी : 
   Voice - माणूस जन्माला येतो तेव्हा काही ठरवून येत नाही. जसे जसे घडत जातो तसे तसे माणूस आपले कार्य करत असतो. माणसाचा सर्वागीण करणे अतीआवश्यक आहे, प्रत्येक कार्य माणसाला सकारात्मक पाऊलाकडे नेतो. हा भाग नक्षलग्रस्त असून आपल्या विभागाची शाळा ही मोठ्या नावारुपास आहे. माणूस जेव्हा स्वतः चा सर्वागीण विकास करेल तेव्हा राष्ट्रोन्नती होणार. म्हणून राष्ट्राच्या विकासासाठी आधी प्रथम स्वतः चा सर्वागीण विकास करावा असे प्रतिपादन पुणे येथील समाज कल्याण मुख्यालयाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी अमृत महोत्सव आयोजित विद्यार्थ्यांंसी संवाद या कार्यक्रमात बोलताना केले. ते कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 
याप्रसंगी विचार मंचावर प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण नागपूर विभागाचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, समाज कल्याण गोदिंया सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण जात पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त श्री. पांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या दहिवले, जिल्हा परिषद सदस्य भूमेश्वर पटले, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, सरपंच पुष्पमाला बडोले, ग्राम विस्तार अधिकारी गणेश मुनेश्वर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
सदर विशेष कार्यक्रम हे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा शाळेत सायंकाळी ०५.०० वाजता सुरू झाले. याप्रसंगी अमृत महोत्सवी फलकाचे, भाषा प्रयोगशाळा व गणित प्रयोगशाळा यांचे अनावरण सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संगीत कक्ष, चित्रकला प्रदर्शनी, हस्तकला प्रदर्शनी, विज्ञान प्रयोगशाळा, डीजीटल वर्गखोल्या, अभ्यासिका कक्ष, संगणक कक्ष, मुलींनी तयार केले अनेक प्रकारचे ग्रीटिंग कार्ड गीफ्ट केले. 
आयुक्त डाॅ नारनवरे पुढे बोलताना म्हणाले- स्वतः पासून नानाविध कला कौशल्य अवगत करून स्वतः ला मोठ्या पदावर या शाळेच्या विद्यार्थीनी नेतील हा विश्वास मला प्रामाणिक आहे. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सिद्धार्थ गायकवाड, भूमेश्वर पटले, चेतन वळगाये सरपंचा बडोले या सर्वांनी शाळेविषयी गौरवोद्धार व्यक्त केले. 
या दरम्यान सदर शाळेतील विद्यार्थीनींनी मान्यवरांच्या समोर वंदे मातरम योगा नृत्य, डंबेल्स, कथक नृत्य, संविधान गीत, प्रार्थना व हर घर तिरंगा असे अनेक वेगवेगळे उपक्रमाचे सादरीकरण करून शाब्बासकी मिळविली. 
या कार्यक्रमाची भूमिका व प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले, संचालन शिक्षक पी. एच. ढवळे तर आभार विनोद मोहतुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रिस्टल कंपनी यांच्या कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments