Advertisement

गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन रामदास कदम यांना विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त करू नका: सुशिलकुमार पावरा

*राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन* 

रत्नागिरी: रामदास कदम यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त करू नका,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                  निवेदनात म्हटले आहे की,रामदास कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.शिवसेना हा चांगला पक्ष आहे व रामदास कदम हा वाईट माणूस आहे. रामदास कदम यांंनी अनेक निरपराध लोकांना अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे.रामदास कदमच्या अत्याचारांमुळे बरीच अन्याय ग्रस्त लोक रोज रडत आहेत, 350 वेळा रडत आहेत, 350 वेळा उपोषण करत आहेत, त्या अन्याय ग्रस्त लोकांच्याही भावना तुम्ही जाणून घ्या.350 वेळा उपोषण करणा-या एका निरपराध आदिवासी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे महापाप रामदास कदम यांनी केले आहे.या पापाचे फळ रामदास कदम आज भोगत आहेत. जैसी करणी वैसी भरणी! याला अडकव त्याला अडकव, याचे आयुष्य उद्ध्वस्त करं त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करं ,हेच धंदे रामदास कदम यांनी आजवर केले आहे.
                  त्या 5 गुरुजींना काय हवं होतं,फक्त त्यांची रोजी रोटी, पगार मिळत नाही म्हणून त्यांनी विजय बाईत नावाच्या विस्तार अधिका-याची तक्रार केली आणि विजय बाईत सारख्या भ्रष्टाचारी,पैसे घेतांना सापडलेला अधिकारी टिव्हीवर दाखवण्यात आले,बोगस, दोषी प्रभारी गटशिक्षणाधिका-याला वाचविण्यासाठी एका निरपराध शिक्षकाला षडयंत्रात रामदास कदम यांनी अटकलं आहे.गुरुजींना लोक देव मानतात, परमेश्वर मानतात.त्याच परमेश्वराला अटकवायला,त्याच्याविरोधात षडयंत्र रचायला रामदास कदम विचार करत नाही.असा माणूस उद्या उठून पदाचा गैरवापर करून कुणालाही अडकवेल,कुणाच्याही विरोधात षडयंत्र रचून आयुष्य उद्ध्वस्त करेल.सुडभावनेने पदाचा दुरूपयोग करेल. रामदास कदम हे अनेक लोकांना अश्लील व अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करतात. 
              मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे ,माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, माझा कुठल्याही पक्षाला विरोध नाही.परंतु रामदास कदम सारख्या वाईट माणसाचा विरोध आहे. यापूर्वीच रामदास कदम यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,शिवसेना पक्षातून हकालपट्टी या मागणीसाठी मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसलो होतो.ती माझी मागणी पूर्ण झाली. रामदास कदम सारख्या वाईट माणसाची शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाली हे एक चांगले काम झालं.
                 परंतू रामदास कदम यांना एकनाथ शिंदे यांच्या गटांत शामिल करुन नेतेपद देण्यात आलं,हे चुकीच झालं.अनेक निरपराध लोकांना अटकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे महापाप रामदास कदम यांनी केले.त्या पापांचा घडा भरून आता फूटत आहे.शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे प्रकरण समोर समोर येत आहे. ही अनेक निरपराध लोकांची प्रकरणे समोर आल्यानंतर तुम्ही सुद्धा रामदास कदम यांना आपल्या गटात ठेवणार नाहीत. रामदास कदम मुळे शिंदे गट बदनाम होईल,कलंकित होईल,सर्व सामान्य जनतेची आपल्या गटाबद्धलची ओढ कमी होईल,म्हणून लवकरात लवकर रामदास कदम यांना शिंदे गटातून सुद्धा हाकलण्यात यावे.शिंदे गटाकडून विधानपरिषद सदस्यत्वासाठी रिक्त 12 जागांसाठी रामदास कदम यांचे नाव देण्यात आले आहे.त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विधानपरिषद सदस्यत्व म्हणून नियुक्त करू नये,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments