Advertisement

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या: बिरसा फायटर्सची मागणी

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रिय.विश्व पञकार 

*85 कोटींचा प्रस्ताव 4 महिन्यांपासून धूळखात*

*आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ध्यांतच शिक्षण सोडावे लागते: सुशिलकुमार पावरा* 

दापोली: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी 85 कोटी 9 लक्ष 17 हजार रूपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करून 17 मार्च 2022 रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महिने लोटून गेले तरी या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही. या प्रस्तावास मंजुरी देऊन अनुसूचित जमातीच्या संशोधक उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, संजय दळवी सचिव, दादाजी बागुल महानिरीक्षक,गणेश खर्डे नंदूरबार कार्याध्यक्ष, जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदूरबार, भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे,विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष, आकाश पवार बागलाण तालुकाध्यक्ष, विजय सहारे नाशिक कार्याध्यक्ष ,सतीश जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष ,कृष्णा भंडारी पुणे जिल्हाध्यक्ष आदि बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी शासनास पाठवले आहे.
                   अनुसूचित जमातीतील विद्यावनस्पती संशोधन विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता आजपर्यंत आदिवासी विकास विभागाने कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही.परंतु आता ही योजना 400 विद्यार्थ्यांसाठी नियोजित करण्यात आली आहे.आदिवासी विकास विभाग मंत्रालयाच्या वतीने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अभिछात्रवृत्ती मिळते पण काही किचकट अटींमुळे महाराष्ट्रातील नगण्य अनुसूचित जमातीतील संशोधक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो व त्याचे प्रमाण सुद्धा अत्यंत नगण्य आहे.ज्या संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्तीचा लाभ मिळत नाही ,त्यांना ब-याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि ब-याचदा काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प अर्ध्यावर सोडून देतात.
                    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे( बार्टी),छत्रपती शाहूमहाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था पुणे(सारथी),महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थांनी विद्यार्थांसाठी अभिछात्रवृत्ती सुरू केली आहे. त्याच प्रमाणे अनुसूचित जमातीतील संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments