Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना विधानपरिषद सदस्यत्व?


*मातोश्री वरुन बिरसा फायटर्सला बोलावणे*

*पक्षप्रवेश नाही;फक्त पाठिंबा देणार: सुशिलकुमार पावरा*

दापोली: बिरसा फायटर्सच्या राज्यात 300 च्या आसपास शाखा झाल्या आहेत ,संघटनेच्या वाढत्या शाखा व दमदार कार्य बघून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख यांचे सुशिलकुमार पावरा यांना मातोश्रीवर बोलावणे आले आहे.मुंबईचे शिवसेना पदाधिकारी यांनी फोन करून सुशिलकुमार पावरा यांचे याबाबत मत जाणून घेतले.सर,तुमचे काम चांगले सुरू आहे.राज्यात 300 च्या आसपास शाखा झाल्या आहेत. तेव्हा तुम्ही शिवसेना पक्षात पक्षप्रवेश कराल का? असा प्रश्न शिवसेना पदाधिकारी यांनी विचारले.त्यावर सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले की,आमची संघटना ही सामाजिक संघटना आहे.आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर काम करते. संघटनेत इतर पक्षाचेही सदस्य आहे.म्हणून पक्षप्रवेश करायचा किंवा नाही? हे मी माझ्या पदाधिका-यांशी चर्चा करून सांगिन. 
                        तूर्तास पक्षप्रवेश नाही करणार , पण आपल्या शिवसेना पक्षाला नक्कीच पाठिंबा देऊ,असे पावरा यांनी सांगितले. ठिक आहे सर, मी उद्धव ठाकरे साहेबांना तसे सांगतो.उद्धव ठाकरे साहेबांची वेळ घेऊन तुम्हाला कळवतो.तुमचे काही असतील तर घेऊन या.आदित्य ठाकरे साहेब अधिवेशनात विधानसभेत मांडतील.किती लोक येणार आहेत,ते कळवा.जास्त लोकांच्या उपस्थित पाठिंबा दिला तर बरं होईल. आज शिवसेना पक्षाला छोट्या मोठ्या संघटनांनी साथ देण्याची वेळ आली आहे.तुमच्या पाठिंब्याने पक्षाला आणखीन बळ मिळेल. पक्षाचीही तुमच्या संघटनेला साथ होईल, अडीअडचणीला मदत होईल.
            माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधातले विडीओ व तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भातील सुशिलकुमार पावरा यांचे विडीओ बघून शिवसेना प्रमुख व पदाधिकारी प्रभावीत झाले आहेत, असे बोलले जात आहे.त्याचबरोबर सुशिलकुमार पावरा यांच्या 318 वेळा उपोषणानेही लक्ष वेधले आहे. पक्षाला पाठिंबा द्यायला काही हरकत नाही,असे एकमत बिरसा फायटर्स पदाधिकारी मध्ये झाले आहे.विधानपरिषदेत शिवसेनेच्या 11 रिक्त जागांमधून सुशिलकुमार पावरा यांना विधानपरिषद सदस्य म्हणून घ्यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे होणार आहे.

Post a Comment

0 Comments