Advertisement

आदिवासींचे लूटारू,आदिवासींचे पैसे वापस करा!

*विजयकुमार गावित यांना मंत्रीपदावरून हटवा मागणीसाठी पावरांचे उपोषण* 

*6000 कोटींचा भ्रष्टाचार सिद्ध तरी तेच आदिवासी विकास विभाग खाते का दिले?*

नंदूरबार :6000 कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांचे आदिवासी विकास मंत्रीपद रद्द करा व अटक करा,या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे उपोषण करून भ्रष्टाचार घोटाळ्याचा निषेध केला आहे.आदिवासींचे लूटारू,आदिवासींचा पैसा वापस करा,अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे.भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला होता.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष सह एकूण 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली होती.तरीही विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार केलेले पूर्वीच्याच खात्याचे आदिवासी विकास मंत्रीपद दिल्यामुळे आदिवासी समाजात संताप निर्माण झाला आहे.
                 विजयकुमार गावित यांच्यावर आदिवासी विकास विभागात 6000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला असताना गावित यांना तेच आदिवासी विकास खाते पुन्हा का देण्यात आले ? असा सवाल पावराने उपस्थित केला आहे.सन 2004 ते 2009 या काळामध्ये विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री असताना झालेल्या या घोटाळ्यावर न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड समितीने 3000 पानांचा चौकशी अहवाल शासनास सादर केला आहे.यात संबंधित अधिकारी ,कंत्राटदार व आदिवासी विकास मंत्री दोषी असल्याचे स्पष्ट झाले.गॅस शेगड्या योजनेत आदिवासींना गॅस शेगड्या पुरवण्याची योजना आदिवासी महामंडळाने आखली.त्या योजनेत भट्ट्याभोळ उडाला आहे.सन 2004 ते 2009 या कालावधीत विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री असताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एम.जी.गायकवाड समिती नेमण्यात आली होती.समितीने 3000 पानांचा चौकशी अहवाल शासनास सादर केला आहे. हा मोठा घोटाळा अधिकारी,कंत्राटदार व मंत्री यांनी संगनमताने केला आहे,म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा,असे न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे. 
                    तिरडा गावात फक्त 200 कुटुंब संख्या असताना कन्यादान योजनेअंतर्गत 800 खोटी लग्न दाखवून आदिवासींच्या मंगळसूत्रावरच डल्ला मारण्यात आला,हे उघड झाले आहे.गॅसशेगड्या वाटप योजनेत,डिझेल पंप वाटप योजनेत तसेच दूधाळ जनावरे वाटप योजनेत आदिवासींना लाभ न देता करोंडांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड चौकशी समितीने ठेवला आहे. अशा मोठ्या घोटाळ्यात दोषी असणारे विजयकुमार गावित यांना मंत्रीपदावरून हटवा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी उपोषणाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments